
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची थाटात WTC फायनल मध्ये एन्ट्री! टीम इंडिया बाहेर?
India vs Australia WTC Final Qualification : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळल्या गेला. या सामन्यात टीम इंडियाला एक लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियन संघाने तिसरा सामना जिंकून ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकत अंतिम फेरीत त्यांचे स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाचा पराभवामूळे मार्ग कठीण झाला आहे. या स्थितीत भारताला चौथी कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल. बरोबरी किंवा पराभव झाल्यास न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेतील निकालावर अवलंबून रहावे लागेल.
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाल्यास, 2021-23 सायकलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाची त्यांच्या शेवटच्या मालिकेतील 3 सामन्यांनंतर 68.52 टक्के विजयाची टक्केवारी आहे, तर भारताची विजयाची टक्केवारी 60.29 टक्क्यांवर आली आहे. श्रीलंकेचा संघ तिसर्या क्रमांकावर नक्कीच आहे, पण यावेळी त्यांची विजयाची टक्केवारी 53.33 टक्के आहे.
WTC 2023 चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. फायनल 7 ते 11 जून दरम्यान खेळल्या जाणार आहे, तर 12 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. न्यूझीलंड संघाने भारताचा पराभव केला.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापूर्वी सामना संपवला. त्याने 18.1 षटकांत 76 धावांचे लक्ष्य गाठले. कांगारू संघाने एका विकेटवर 78 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड 53 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी मारांश लबुशेनने नाबाद 28 धावा केल्या. उस्मान ख्वाजा खाते उघडू शकला नाही. या विजयासह त्याने मालिकेत पुनरागमन केले आहे. पहिले दोन कसोटी सामने जिंकूनही भारत 2-1 ने आघाडीवर आहे. आता उभय देशांमधील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळल्या जाणार आहे.
भारताने पहिल्या डावात 109 धावा केल्या होत्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने 197 धावा केल्या होत्या. त्याला 88 धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात 163 धावांत सर्वबाद झाला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात कांगारू संघाने 18.5 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 78 धावा करत सामना जिंकला.