IND vs AUS : टीम इंडियाचा उपकर्णधार कोण.... अखेर 'त्या' DRSने केला शिक्कामोर्तब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS test cheteshwar pujara finally sealed vice-captain of Team India by taking usman khawaja DRS

IND vs AUS : टीम इंडियाचा उपकर्णधार कोण.... अखेर 'त्या' DRSने केला शिक्कामोर्तब

Indian Test Team Vice Captain : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाचा उप-कर्णधारपद केएल राहुल होता. परंतु पुढच्या दोन सामन्यांसाठी जेव्हा संघाची निवड झाली तेव्हा केएल राहुल यांना उप-कर्णधारातून काढून टाकण्यात आले. असे मानले जाते की या मालिकेत आता नवीन उप-कर्णधाराची घोषणा केली जाऊ शकते पण तसे काही झाले नाही.

केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआयच्या निवडसमितीने संघाचा उपकर्णधार कोण असेल याबाबत कोणताही घोषणा केली नाही. त्यामुळे रोहित शर्माचा डेप्युटी कोण अशी चर्चा सुरू झाली. आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. टीम इंडियाचा उपकर्णधारपदावर त्या एका डीआरएसने शिक्कामोर्तब केला आहे.

भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद कोणाकडे याणार याबाबत आधी अंदाज वर्तवल्या गेला होता. या रेसमध्ये तीन नावे जास्त आघाडीवर होते पहिले म्हणजे फिरकीपटू आर. अश्विन, दुसरे चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरचे नाव चर्चेत होते, पण आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा भारतीय संघासमोर खडकासारखा उभा राहिला. त्याने तब्बल 10 तासांहून अधिक काळ भारतीय गोलंदाजांना दमवले. यादरम्यान त्याने 180 धावांची खेळी केली.

कर्णधार रोहित शर्माचा प्रत्येक डाव ख्वाजासमोर अपयशी ठरत होता, पण दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्राच्या सुरुवातीला अक्षर पटेलने उस्मान ख्वाजाला एलबीडब्ल्यू केले. मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी ख्वाजाला नाबाद दिले होते. कर्णधार रोहित शर्मा मैदानावर उपस्थित नव्हता. अशा स्थितीत चेतेश्वर पुजाराने डीआरएस घेतला. म्हणजेच रोहितच्या अनुपस्थितीत पुजारा कर्णधार होता. यांचा अर्थ असा होता की चेतेश्वर पुजारा टीम इंडियाचा उपकर्णधार झाला आहे.