IND vs AUS: दिल्ली कसोटीनंतर 'या' दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपली? निवडकर्त्याने दिली मोठी अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus test david warner-career-ended delhi-test-questions-but-selector-did-not-update

IND vs AUS: दिल्ली कसोटीनंतर 'या' दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपली? निवडकर्त्याने दिली मोठी अपडेट

Ind vs Aus Test Series : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत यजमानांनी पहिले दोन कसोटी सामने जिंकून 2-0 अशी आघाडी कायम ठेवली. इंदूरचे यजमानपद मालिकेतील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून खेळल्या जाणार आहे. दरम्यान खेळाडूच्या कसोटी कारकिर्दीवर संशयाचे ढग दाटले आहेत.

पाच दिवसांच्या फॉर्मेटमध्ये प्रदीर्घ खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीवर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. गेल्या तीन वर्षांत त्याला केवळ एकच कसोटी शतक झळकावता आले. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांचा तो भाग होता पण विशेष काही करू शकला नाही. त्याने दोन्ही कसोटी सामन्यांच्या 3 डावात एकूण 27 धावा केल्या. सध्या तो दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे.

ऑस्ट्रेलियाचे निवडकर्ते टोनी डोडमेड यांनी बुधवारी वॉर्नरच्या भवितव्याबद्दल आणि अॅशेस दौऱ्यासाठी त्याच्या नावाबाबतच्या चर्चेवर भाष्य करण्यास नकार दिला. तो म्हणाला, आम्ही ऍशेस योजनेबद्दल नंतर बोलू, परंतु कसोटी मालिकेसाठी विशेषतः ऍशेससारख्या मोठ्या मालिकेसाठी सर्वोत्तम तंदुरुस्त आणि उपलब्ध खेळाडूंची निवड करण्याचा आमचा निर्धार आहे.

डेव्हिड वॉर्नरला मात्र भारताविरुद्ध 17 मार्चपासून मुंबईत सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघाचा भाग बनवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली असून, त्यांचे कर्णधारपदही पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आले आहे.