
IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघाचा दुष्काळात तेरावा! दोन दिग्गज खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर
India vs Australia Test Series : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात दोन्ही कसोटी यजमानांनी आपल्या नावावर केली आहे.
त्याचवेळी मालिकेतील तिसर्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हे दोघेही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. दोन्ही खेळाडू कर्णधार पॅट कमिन्ससोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
भारताविरुद्ध सलग दोन कसोटी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. त्याचवेळी दिल्ली कसोटीनंतर कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणामुळे ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. कमिन्स इंदूर कसोटी अर्थात तिसर्या सामन्यापूर्वी भारतात परतणार आहे.
पण डेव्हिड वॉर्नर आणि जोश हेजलवुड दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत. वॉर्नर दुसऱ्या कसोटीसाठी संघाचा होता, त्यावेळीस पहिल्या डावात मोहम्मद सिराजच्या चेंडूवर त्याच्या डोक्याला आणि कोपराला मार लागला होता.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड भारताविरुद्धच्या संपूर्ण मालिकेसाठी बाहेर गेला आहे. त्याचवेळी वॉर्नरही त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाला परत जाऊ शकतो. या मालिकेत जोश हेजलवुडने एकही सामना खेळला नाही. मालिकेपूर्वीच तो जखमी झाला होता. त्याचवेळी वॉर्नर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिली कसोटी एक डाव आणि 132 धावांनी गमावली आणि दुसरी कसोटी 6 विकेटने गमावली. यासोबतच संघातील स्टार खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघालाही मोठा फटका बसत आहे. त्याचबरोबर पाहुण्या संघाला मालिका वाचवण्यासाठी उर्वरित दोन्ही कसोटी जिंकाव्या लागतील.