
IND vs AUS : इंदूर कसोटीत 'या' खेळाडूची कारकीर्द संपणार! रोहितने संधी दिली मात्र...
India vs Australia Test : टीम इंडियाच्या एका खेळाडूंची इंदूर कसोटीमुळे कारकीर्द संपत असल्याचे दिसत आहे. संघासाठी प्रत्येक सामन्यात तो खलनायक ठरला आहे. आता या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण मानल्या जात आहे. या खेळाडूच्या खराब कामगिरीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे.
बहुतेक क्रिकेट चाहत्यांना हा खेळाडू टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर हवा आहे. अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात या खेळाडूला कोणत्याही परिस्थितीत वगळण्यात येणार आहे. आपल्या फ्लॉप कामगिरीमुळे या खेळाडूने कर्णधार रोहित शर्माचा विश्वास गमावला आहे.
इंदूर कसोटीनंतर यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला टीम इंडियातून वगळले जाऊ शकते. अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इशान किशनला संधी देऊ शकतो. केएस भरत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर, दिल्ली आणि इंदूर येथे खेळल्या गेलेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. टर्निंग खेळपट्ट्यांवर केएस भरत विकेटकीपिंगदरम्यान देखील संघर्ष करताना दिसला आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात केएस भरत केवळ 17 आणि 3 धावा करून बाद झाला. केएस भरतच्या फलंदाजीतही एक्स फॅक्टर नाही. ज्या क्रमांकावर केएस भरत मधल्या फळीत फलंदाजी करतो, तिथे टीम इंडियाला एका स्फोटक फलंदाजाची उणीव भासत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर, दिल्ली आणि इंदूर कसोटी सामन्यात केएस भरतला फलंदाजीच्या जोरावर केवळ 8, 6, 23 (नाबाद), 17 आणि 3 धावा करता आल्या आहेत, पण टीम इंडियाला केएस भरतकडून आक्रमक यष्टीरक्षक फलंदाजाची गरज आहे.
इशान किशनचा बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी यष्टीरक्षक म्हणून टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंतच्या अपघातानंतर संघाला खालच्या मधल्या फळीत एका स्फोटक फलंदाजाची गरज होती. यामुळे इशान किशनचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र पहिल्या ३ सामन्यात इशान किशनला खेळण्याची संधी मिळाली नाही.
इशान किशनच्या जागी केएस भरत खेळला. फलंदाजीत केएसची कामगिरी खूपच निराशाजनक होती. टीम इंडियाला केएस भरतकडून अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही. यामुळे संघ व्यवस्थापन इशान किशनला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून आजमावू शकते.