IND vs AUS: जसप्रीत बुमराह बाबत मोठे अपडेट! ऑस्ट्रेलिया मालिकेत खेळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS Jasprit Bumrah

IND vs AUS: जसप्रीत बुमराह बाबत मोठे अपडेट! ऑस्ट्रेलिया मालिकेत खेळणार

IND vs AUS Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात बॉर्डर गावसकर करंडक 4 कसोटी सामने आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणार आहेत. या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय संघाचा भाग असू शकतो.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत आहे. बुमराह दुखापतीमुळे न्यूझीलंड मालिकेतही संघाचा भाग नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तो आता पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इनसाइडस्पोर्टच्या एका बातमीनुसार, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्चपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवल्या जाणार आहे. या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करू शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला आशा आहे. पण त्याच्या प्रगतीवर ते अवलंबून असेल.

जुलै 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराहच्या कंबरेला 'स्ट्रेस फ्रॅक्चर' झाला होता. या दुखापतीमुळे गतवर्षी आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतुन तो बाहेर गेला. जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी आतापर्यंत 30 कसोटी सामने, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 128, एकदिवसीय सामन्यात 121 आणि T20 मध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत.