
Virat Kohli : कपाळावर चंदनाचा टिळा... गळ्यात रुद्राक्ष माळा! कोहली पोहोचला महाकालच्या दारी
Virat Kohli Wife Anushka Sharma : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची बॅट अजूनही शांत आहे. इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो येथेही अपयशी ठरला. इंदूर कसोटीच्या विराट कोहलीने पहिल्या डावात 22 तर दुसऱ्या डावात 13 धावा केल्या. यापूर्वी दिल्ली आणि नागपूर कसोटीतही त्यांची अशीच अवस्था झाली होती. अशा स्थितीत विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी देवाच्या दारी पोहोचला आहे.
इंदूर कसोटीनंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत उज्जैनला महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. दोघांनीही मंदिरात जाऊन पंचामृत पूजन अभिषेक केला. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भारताचा माजी कर्णधार मंदिराच्या गर्भगृहाबाहेर बसून भोलेनाथाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये विराट पारंपारिक पोशाख परिधान केलेला दिसत आहे.
यादरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्मा फिकट गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहे, तर विराट कोहली कपाळावर चंदन आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घालुन बसला आहे. येथे पती-पत्नी दोघेही महाकालसमोर हात जोडून बसलेले दिसत आहे. मंदिरातून बाहेर पडताना अनुष्काने पत्रकारांना सांगितले की, आम्ही येथे पूजा करण्यासाठी आलो होतो आणि महाकालेश्वर मंदिरात ‘दर्शन’ केले.
भगवान महाकालचे दर्शन घेतल्यानंतर अनुष्का शर्मा म्हणाली की भगवान महाकालचा आशीर्वाद मिळाल्याने खूप छान वाटले. तत्पूर्वी नवीन वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बाबा नीम करौली यांच्या आश्रमात गेले होते. वृंदावनात दोनच दिवस राहिले. यानंतर ते आनंदमाई आश्रमात पोहोचले, तेथे त्यांनी संतांची भेट घेतली.