WTC Final : जिंकलस भावा! लंडनच्या ओव्हलवर मराठमोळ्या रहाणे-शार्दुलचा मराठी संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल | Ind vs Aus | Ajinkya Rahane and Shardul Thakur Talking Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajinkya rahane and shardul thakur

Ind vs Aus WTC Final : जिंकलस भावा! लंडनच्या ओव्हलवर मराठमोळ्या रहाणे-शार्दुलचा मराठी संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल

Ind vs Aus WTC Final : लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार गडी गमावून 123 धावा केल्या आहेत. सध्या कॅमेरून ग्रीन सात आणि मार्नस लबुशेन 41 धावांवर नाबाद आहे. भारतीय संघ आता चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल.

फायनलमध्ये तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड मजबूत केली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला पण दुसऱ्या दिवशी मधल्या फळीतला फलंदाज अजिंक्य रहाणेने कांगारूंच्या गोलंदाजांना घाम फोडला.

जवळपास दीड वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने खालच्या फळीतील शार्दुल ठाकूरसह सातव्या विकेटसाठी 109 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. असे असतानाही टीम इंडिया पहिल्या डावात ऑस्ट्रेलियापेक्षा 173 धावांच्या मोठ्या फरकाने मागे पडली.

रहाणेने 129 चेंडूत 89 धावा करत कसोटी क्रिकेटमधील 5000 धावाही पूर्ण केल्या. 5000 कसोटी धावा करणारा तो 13वा भारतीय फलंदाज ठरला. शार्दुलने कसोटीतील चौथे अर्धशतक झळकावले. चारही अर्धशतके त्याच्या बॅटने परदेशी भूमीवर झाली आहेत.

अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरच्या या भागिदारीवेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईकर असलेल्या दोन्ही खेळाडूंचा ओव्हलच्या मैदानावरचा मराठीमध्ये केलेला संवाद ऐकू येत आहे.