Ind vs Aus WTC Final Day 3 : जडेजाने पाडले खिंडार; तिसऱ्या दिवसअखेर कांगारूंचे 4 फलंदाज तंबूत| Cricket News in Marathi | WTC Final Tournament News | today cricket match Updates | today match ind vs aus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind vs Aus WTC Final Day 3

Ind vs Aus WTC Final Day 3 : जडेजाने पाडले खिंडार; तिसऱ्या दिवसअखेर कांगारूंचे 4 फलंदाज तंबूत

Ind vs Aus WTC Final Day 3 Live : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिसऱ्या दिवशी कांगारूंनी भारताचा पहिला डाव 296 धावात गुंडाळात 173 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात 4 बाद 123 धावा केल्या. आता त्यांच्याकडे 296 धावांची आघाडी आहे.

भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या दिवशी थोडा झुंजारपणा दाखवला. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची शतकी खेळी करत भारताला 296 धावांपर्यंत पोहचण्यास मदत केली. अजिंक्य रहाणेने झुंजार फलंदाजी करत 89 धावांची खेळी केली. मात्र त्याला शतक पूर्ण करता आले नाही.

शार्दुल ठाकूरने देखील अजिंक्यला चांगली साथ दिली. त्याने 51 धावांची अर्धशतकी खेळी करत भारताला 300 धावांच्या जवळ पोहचवले. मोहम्मद शमीने देखील 13 धावांचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करत कांगारूंना पाठोपाठ धक्के देण्यास सुरूवात केली. मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला 1 धावांवर बाद केले. त्यानंतर उस्मान ख्वाजाला उमेश यादवने चहापानानंतर 13 धावांवर बाद केले.

मात्र तिसऱ्या विकेटसाठी स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी 62 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला शतकाच्या जवळ पोहचवले. अखेर ही जोडी रविंद्र जडेजाने फोडली. त्याने स्मिथला 34 धावांवर बाद केले. पाठोपाठ पहिल्या डावातील शतकवीर ट्रेविस हेडला देखील 18 धावांवर बाद करत जडेजाने कांगारूंचा चौथा फलंदाज माघारी धाडला.

ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर ढेपाळत असताना मार्नस लाबुशेनने मात्र एक बाजू लावून धरली होती. त्याने तिसऱ्या दिवसअखेर नाबाद 41 धावा करत ऑस्ट्रेलियाला 4 बाद 123 धावांपर्यंत पोहचवले. ऑस्ट्रेलियाकडे आता 296 धावांची आघाडी आहे.

जड्डूची कमाल, हेडलाही केलं बाद 

रविंद्र जडेजाने पहिल्या डावातील शतकवीर स्मिथ पाठोपाठ ट्रेविस हेडला देखील बाद केले. तो 18 धावांवर बाद केलं.

86-3 : जडेजाने स्मिथचा अडसर केला दूर 

ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला 86 धावांपर्यंत पोहचवले. मात्र ही जोडी रविंद्र जडेजाने स्मिथला 34 धावांवर बाद केले.

24-2  : ख्वाजा माघारी

चहापानानंतर भारताने कांगारूंना अजून एक धक्का दिला. उमेश यादवने उस्मान ख्वाजाला 13 धावांवर बाद करत कांगारूंना दुसरा धक्का दिला.

चहापानापर्यंत एक कांगारू माघारी 

ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव 296 धावात गुंडाळत 173 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डाव खेळण्यासाठी खेळपट्टीवर आलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरूवातीलाच पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला 1 धावेवर बाद केले. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत 1 बाद 23 धावा केल्या. उस्मान 13 तर मार्नस 8 धावा करून नाबाद होते.

भारताच्या पहिल्या डावात 296 धावा 

शार्दुल ठाकूर अर्धशतकानंतर बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने 11 चेंडूत 13 धावा करत भारताला 296 धावांपर्यंत पोहचवले. अखेर मिचेल स्टार्कने मोहम्मद शमीला बाद करत भारताचा पहिला डाव संपवला.

 294-9 : शार्दुल ठाकूरचे अर्धशतक 

अजिंक्य बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याला साथ देण्यासाठी आलेला उमेश यादव एक चौकार मारून परतला. मात्र मोहम्मद शमीने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. शार्दुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र कॅमेरून ग्रीनने त्याला 51 धावांवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

 261-7 : अजिंक्यचे शतक हुकले

उपहारानंतर अखेर ऑस्ट्रेलियाला भारताची शतकी भागीदारी तोडण्याची संधी मिळाली. पॅट कमिन्सने अजिंक्य रहाणेला 89 धावांवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला. आता शार्दुल ठाकूरवरच भिस्त असेल.

उपहारापर्यंत भारताच्या 60 षटकात 6 बाद 260 धावा 

अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचत भारताला तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत 260 धावांपर्यंत पोहचवले. खेळ थांबला त्यावेळी अजिंक्य 89 तर शार्दुल ठाकूर 36 धावा करून नाबाद होते.

220-6 (52 Ov) : दोन मुंबईकरांची कडवी झुंज

भारताने तिसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 5 बाद 151 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मात्र सुरूवातीलाच श्रीकार भरत 5 धावांवर बोलँडची शिकार झाला. यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूरने अजिंक्य रहाणेला साथ देण्यास सुरूवात केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी भागादारी रचत संघाला 200 धावांच्या पार पोहचवले. दरम्यन, मुंबईकर अजिंक्य रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण करत तब्बल 18 महिन्यांनी केलेले आपले पुनरागमन यशस्वी करून दाखवले.

Ind vs Aus WTC Final Day 3 Live: तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या चेंडूवर भारताला मोठा धक्का!

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच भारताला मोठा धक्का बसला आहे. केएस भरत 15 चेंडूत पाच धावा करून बाद झाला. स्कॉट बोलंडने त्याला क्लीन बोल्ड केले. आता शार्दुल ठाकूर अजिंक्य रहाणेसोबत क्रीजवर आहे. भारताची धावसंख्या 39 षटकांत 6 बाद 154 अशी आहे.

फॉलोऑनचा धोका! तिसऱ्या दिवशी टीम इंडिया काय करणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतावर फॉलोऑनचा धोका निर्माण झाला आहे. आता त्याला टाळण्याची जबाबदारी अजिंक्य रहाणे आणि केएस भरत या जोडीवर आहे. कारण त्यानंतर टेलेंडर खेळाडू येतील. रहाणे सध्या 29 धावांवर नाबाद आहे. आणि भरत 5 धावांवर खेळत आहे.

सध्या भारताच्या 5 विकेटवर 151 धावा आहेत. म्हणजे ते ऑस्ट्रेलियापेक्षा 318 धावांनी मागे आहेत. अशा स्थितीत फॉलोऑन टाळण्यासाठी त्याला आणखी किमान 120 धावा कराव्या लागतील.