
Ind vs Aus WTC Final : 'अंपायर आंधळे झालेत...', ऑस्ट्रेलियाकडून चेंडूशी छेडछाड, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप
Ind vs Aus WTC Final 2023 : भारताविरुद्ध ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चेंडूशी छेडछाड केली. त्यामुळे त्यांना चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्या विकेट मिळवता आल्या, असा सनसनाटी आरोप पाकिस्तानचे माजी खेळाडू बासित अली यांनी केला आहे.
शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी उजव्या यष्टीबाहेर चेंडू असल्यामुळे खेळण्याचा प्रयत्न केला नाही; परंतु हे चेंडू अचानक आत आले आणि त्यांच्या उजव्या यष्टी उडाल्या; तर मिशेल स्टार्कच्या अचानक उडालेल्या चेंडूवर विराट कोहली बाद झाला.
ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजी करत असताना भारतीय गोलंदाज चेंडू रिव्हर्स स्विंग होण्यासाठी प्रयत्न करत होते त्यासाठी त्यांना ७२ किंवा ७४ च्या पटकापर्यंत वाट पहावी लागली. त्या वेळी चेंडूची लकाकी असलेली बाजू बाहेरच्या बाजूला होती; पण मिशेल स्टार्कने २० व्या षटकातच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रिव्हर्स स्विंग कसे काय केले. स्टार्कचाही चेंडू अचानक कसा काय उडाला, असा प्रश्न बासित अलीने उपस्थित केला आहे.
पुजारा आणि गिल हे दोन्ही फलंदाज चेंडू सोडताना बाद झाले. बाहेर जाणारा चेंडू अचानक एवढा कसा आत आला, असा सवाल करताना बासित अलीने पंचांनी ही बाद दुर्लक्षित केल्याबद्दल टीका केली आहे. हा तर बॉल टेंपरिंगचा प्रकार होता असे त्याने म्हटले आहे.
कॅमेरून ग्रीनने पुजाराला टाकलेल्या त्या चेंडूची लकाकी असलेल बाजू आतल्या बाजूला होती. सामना दूरचित्रवाणीवर पाहताना माझ्या लक्षात ही बाब आली. बीसीसीआय इतके मोठे मंडळ आहे. त्यांच्या लक्षात हे कसे आले नाही, असेही त्याने म्हटले आहे.