
IND vs AUS : WTC फायनलमध्ये संघात होणार मोठा बदल! फ्लॉप KL राहुलला मिळणार संधी
IND vs AUS WTC Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 3-1 ने जिंकली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले होते.
आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान होणार आहे. लंडनमधील ओव्हल येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका होणार आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल खेळतील, तर आयपीएल संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांचा निर्णय झाल्यानंतर बरीच चर्चा झाली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या ऑस्ट्रेलियन संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर अश्विन-जडेजा यापैकी एकालाच भारतीय संघात संधी दिली जाणार आहे. याशिवाय यष्टिरक्षकाबाबतही अनेक गोष्टी घडत आहेत.
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात नंतर जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या अनुपस्थितीत केएस भरतला यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली असली तरी तो फार काही करू शकला नाही. अशा परिस्थितीत भरतच्या जागी ईशान किशनला संधी देण्याची चर्चा आहे. मात्र KL राहुलचा यष्टिरक्षक म्हणून टीम इंडियात समावेश व्हायला हवा, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
सुनील गावसकर म्हणाले की, तुम्ही केएल राहुलला यष्टिरक्षक म्हणून पाहू शकता. जर त्याने ओव्हलवर पाच किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली तर आपली फलंदाजी अधिक मजबूत होईल. कारण त्याने खरोखरच चांगली फलंदाजी केली आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये त्याने शतक केले. लॉर्ड्सवर WTC फायनलसाठी तुमचा संघ निवडताना KL राहुल लक्षात ठेवा.
KL राहुल खराब फॉर्मशी झुंजत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत त्याला संधी मिळाली आणि दोन्ही वेळी तो अपयशी ठरला. यानंतर त्याच्याकडून संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आणि त्याला संघातूनही वगळण्यात आले.