Ind vs Eng 2nd Test Day 2 : अश्विननं इंग्लिश गड्यांना नाचवलं; टीम इंडियाचा बल्ले बल्ले!

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 14 February 2021

भारतीय संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून दिवसाअखेर पुजारा आणि रोहित नाबाद खेळत होते. 

India vs England 2nd Test Chennai : चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंडला 134 धावांत ऑल आउट करत दुसऱ्या डावाची सुरुवात केली. शुभमन गिलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला असला तरी दुसरा दिवस हा पूर्णपणे भारतीय संघाने गाजवला. दुसऱ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा टीम इंडियाेन 1 बाद 54 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा 25 (62) आणि चेतेश्वर पुजारा 7(18) धावांवर खेळत होते. जॅक लीचने शुभमनला 14 धावांवर माघारी धाडले.  

चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवलेल्या पाहुण्या संघाची दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगलीच दैना झाली. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ आपला पहिला डाव खेळायला मैदानात उतरला. पण त्यांनी भारतीय फिरकीसमोर नांगी टाकली. इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांत आटोपला. त्यामुळे भारतीय   संघाला 198 धावांची आघाडी मिळाली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या मैदानात सुरु आहे. 6 बाद 300 धावांवरुन पंत आणि अक्षर पटेलनं दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. अक्षर पटेलच्या रुपात भारतीय संघला दिवसाच्या पहिल्या षटकात सातवा धक्का बसला. तो 5 धावांवर बाद झाला.यष्टिमागे फोक्सने चोख भुमिका बजावली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ईशांतलाही मोईन खानने त्याच षटकात बाद करत टीम इंडियाला आठवा धक्का दिला. फिरकीला बाजूला करत ज्यो रुटने टीम इंडियाचा डाव आटोपण्यासाठी ओली स्टोनच्या हाती चेंडू सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत त्याने कुलदीपच्या रुपात टीम इंडियाला 9 वा धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या सिराजने चौकाराने खाते उघडले. एका  उसळत्या चेंडूवर तो झेल बाद झाला. ओली स्टोनने त्याच्या रुपात सामन्यातील तिसरे यश मिळवले. दुसऱ्या बाजूला रिषभ पंत 77 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 58 धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाचा पहिला डाव 329 धावांत आटोपला. दुसऱ्या दिवशी तळाच्या फलंदाजांना संघाच्या धावफलकात फक्त 29 धावांची भर घालता आली.  

 

लाईव्ह अपडेट्स

- दुसऱ्या दिवसाअखेर भारत 1 बाद 54 धावा

42-1 : शुभमन गिलच्य रुपात टीम इंडियाला पहिला धक्का; लीचला मिळाले यश 

अश्विनने पुन्हा एकदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट मिळवण्याचा पराक्रम केला
 

134-10 : ब्रॉडला अश्विनने खातेही उघडू दिले नाही. 

131-9 जॅक लीचला ईशांत शर्माने 5 धावांवर पंतकरवी झेलबाद केल.

106-8 : ओली स्टोनला अश्विनने अवघ्या एका धावेवर माघारी धाडले

105-7 : अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोईन अली बाद, त्याने सहा धावा केल्या स्लीमध्ये अजिंक्यनं त्याचा उत्तम झेल टिपला.

 

87-6  : ओली पोपच्या रुपात इंग्लंडला सहावा धक्का, त्याने आतापर्यंतची सर्वाधिक 22 धावांची खेळी साकरली. मोहम्मद सिराजला मिळाले पहिले यश

Image

52-5 : बेन स्टोक्सनंही सोडल मैदान, अश्विन दिला चकवा

39-4 : मैदानात नांगर टाकण्याची क्षमता असलेल्या लॉरेन्सला अश्विवने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 52 चेंडूचा सामना केल्यावर नऊ धावा केल्या

 23-3 : इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटच्या रुपात मोठा मासा घावला गळाला, अक्षर पटेलची कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट, रुटने अवघ्या 6 धावा केल्या 

16-2  : सिब्ले अश्विनच्या जाळ्यात अडकला, त्याने 25 चेंडूत 16 धावा केल्या

0-1 : पहिल्या डावात भारतीय संघाने शून्यावर विकेट गमावली होती, अगदी तोच रिप्लाय इंग्लंडच्या पहिल्या डावातही पाहायला मिळाला. रॉय बर्न्सला ईशांतने पहिल्याच षटकात माघारी धाडले. त्याला खातेही उघडता आले नाही.

 

भारतीय संघाचा पहिला डाव - सर्व बाद 329

रोहित शर्मा-161 (231)

अजिंक्य रहाणे  67(149)

रिषभ पंत 58(77)*

329- ओली स्टोन याने सामन्यातील तिसरे यश, मोहम्मद सिराज एक चौकार मारुन झाला झेलबाद

325-9 : कुलदीपनंही सोडली पंतची साथ, ओली स्टोनला मिळाले दुसरे यश कुलदीपला खातेही उघडता आले नाही. 

Image

 

- पंतचं दिमाखदार अर्धशतक 

301-8 : ईशानला मोईन अलीनं खातेही उघडू दिले नाही. बर्न्सच्या हाती झेल देऊन तो माघारी फिरला 

301-7 : मोईन अलीनं अक्षर पटेलला धाडले तंबूत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ind vs Eng 2nd Test Chennai Day 2 Live Cricket Score Rishabh Pant Moeen Ali Record match summary