esakal | IND vs ENG: शार्दूल, विराटची अर्धशतके; पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-Shardul-Thakur

शार्दूल, विराटची अर्धशतके; पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng 4th Test: इतर फलंदाज अपयशी, ख्रिस वोक्सचे ४ बळी

Ind vs Eng 4th Test Live Updates Innings Break: चौथ्या कसोटी सामन्यातील भारताचा पहिला डाव पहिल्याच दिवशी संपुष्टात आला. विराट कोहली वगळता वरच्या फळीतील कोणत्याही फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. १२७ धावांवर भारताचे ७ गडी बाद झाले होते. पण मराठमोळ्या शार्दूल ठाकूरने भारताची लाज राखली. त्याच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने १९१ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ४, रॉबिन्सनने ३ तर अँडरसन आणि ओव्हरटनने १-१ बळी टिपला.

चौथ्या कसोटीत टॉस जिंकून जो रूटने भारताला फलंदाजी दिली. रोहित आणि राहुल या सलामी जोडीने सुरूवात चांगली केली होती. पण एका अचानक बाऊन्स झालेल्या चेंडूवर रोहित बाद झाला. त्याने ११ धावा केल्या. पाठोपाठ राहुलही १२ धावांवर पायचीत झाला. DRSमध्ये पंचांचा कॉल (Umpires Call) अंतिम ठरल्याने भारताचा रिव्ह्यू शाबूत राहिला पण राहुलला माघारी जावे लागले. त्यानंतर चेतेश्वर पुजारादेखील जेम्स अँडरसनच्या स्विंग गोलंदाजीचा शिकार झाला. त्याला केवळ ४ धावाच करता आल्या. त्यानंतर विराटची साथ करण्यासाठी रविंद्र जाडेजाला पाठवण्यात आले. जाडेजाने पहिले सत्र संपेपर्यंत कोहलीला चांगली साथ दिली.

दुसऱ्या सत्रात मात्र त्याला फार काळ तग धरता आले नाही. तो १० धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेसुद्धा १४ धावांवर माघारी परतला. पण विराट कोहलीने मात्र झुंजार खेळी करत ९६ चेंडूत ८ चौकारांसह ५० धावा केल्या. तो बाद झाल्यावर ऋषभ पंतही पटकन माघारी परतला. पण शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव या दोघांनी डावाला आकार दिला. त्यांनी ६३ धावांची भागीदारी केली. पण शार्दूल बाद झाल्यावर भारताचा डाव १९१ धावांवर आटोपला.

loading image
go to top