IND vs ENG: इंग्लंडच्या कर्णधाराने भारताविरूद्ध रचला इतिहास!

IND vs ENG: इंग्लंडच्या कर्णधाराने भारताविरूद्ध रचला इतिहास! दमदार फलंदाजीच्या जोरावर केला धमाकेदार विक्रम Ind vs Eng Joe Root becomes England leading run getter in international cricket surpasses Alastair Cook against Team India vjb 91
Joe Root
Joe Root

दमदार फलंदाजीच्या जोरावर केला धमाकेदार विक्रम

IND vs ENG 1st Test: भारतीय संघाविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना कर्णधार जो रूट याने इतिहास रचला. भारत चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानात उतरला. या पाचही गोलंदाजांचा नेटाने सामना करत जो रूटने आपली खेळी रंगवली. भारतात झालेल्या कसोटी मालिकेत जो रूटने गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. तशीच काहीशी सुरूवात त्याने इंग्लंडच्या मैदानावर केली. सुंदर असा चौकार लगावत जो रूटने इतिहास रचला.

Joe Root
व्वा पंत.. मान गये आपको!! ट्विटरवर ऋषभ भाऊंची 'फुल्ल ऑन हवा'

रूट ठरला इंग्लंडचं 'रनमशिन'

इंग्लंडच्या पहिल्या डावात ३३वे षटक सुरू होते. त्यावेळी जो रूटने शानदार चौकार लगावत इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या अलिस्टर कूकला मागे टाकले. त्या चौकारासह रूटच्या १५ हजार ७३९ धावा झाल्या. कूकने आपल्या १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २५७ सामने खेळले आणि त्यात त्याने एकूण १५ हजार ७३७ धावा केल्या. पण रूटने मात्र आपल्या २९०व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कूकला मागे टाकत इतिहास रचला. इंग्लंडच्या क्रिकेटच्या इतिहासात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

Joe Root
Video: ऋषभ पंत मागेच लागला, मग विराटने घेतला DRS अन् पुढे...

विराट आणि टेलर रूटच्या पुढेच

जो रूटने १५ हजार ३९३ धावांचा टप्पा पार करत सर्वकालीन फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये २९ वा क्रमांक पटकावला. सध्या सक्रिय असलेल्या क्रिकेटर्समध्ये (निवृत्त न झालेल्या) रूट आंतरराष्ट्रीय धावांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत विराट कोहली २२ हजार ८७५ धावांसह अव्वल तर न्यूझीलंडचा रॉस टेलर १८ हजार ५४ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

Joe Root
Video: 'स्विंगमास्टर' बुमराह! पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का

जो रूटचे दमदार अर्धशतक

भारताविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात जो रूटने प्रथम फलंदाजी करत दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ९१ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. महत्त्वाचे बाब म्हणजे रूटने अर्धशतकी खेळी करताना तब्बल ९ चौकार खेचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com