esakal | IND vs ENG : कॅच सोडला की मॅच सोडली?
sakal

बोलून बातमी शोधा

Siraj

IND vs ENG : कॅच सोडला की मॅच सोडली?

sakal_logo
By
सुशांत जाधव

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हलच्या मैदानातील चौथा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आहे. भारतीय संघाने ठेवलेल्या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडने तडाखेबाज प्रत्युउत्तर दिले आहे. सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन इंग्लंडला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले आहे. रॉरी बर्न्सच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळाले. शार्दूल ठाकूरने इंग्लंडची सेट झालेली जोडी फोडत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 48 व्या षटकात भारतीय संघाला दुसरे यशही मिळाले असते. पण जडेजाच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने सहज आणि सोपा वाटणारा झेल सोडला. रोहित शर्माच्या झेल सोडल्याची मोठी किंमत जशी इंग्लंडला मोजावी लागली तशीच परिस्थिती आता भारतीय संघावरही ओढावू शकते.

याच कारण सिराजने ज्याचा कॅच सोडलाय तो हसीब हमीद अर्धशतकी खेळी करुन सेट झालाय. त्याची ही विकेट टीम इंडियाला गोत्यात आणणारी ठरु शकते. सिराजने झेल सोडल्यानंतर ट्विटरवर #Siraj हा ट्रेंड पाहायला मिळतोय. मिम्सच्या माध्यमातून नेटकरी सिराजला ट्रोल करत आहेत. काही नेटकऱ्यांनी आयपीएलमधील काही फोटो शेअर करतही सिराजवर निशाणा साधलाय.

सलामीवीर रॉरी बर्न्स 31 (109) आणि हमीद 43 (85) यांनी बिन बाद 77 धावांवरुन पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकी खेळीसह पहिल्या विकेटसाठी 100 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. अर्धशतक पूर्ण करणाऱ्या बर्न्सला शार्दूल ठाकूरनं पंतकरवी झेलबाद केले. त्याने 125 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या डेविड मलानने धावबादच्या रुपात विकेट फेकली. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला अजूनही 200 + धावा करायच्या असून भारतीय संघाला आता 8 विकेट मिळवण्याची आवश्यकता आहे.

loading image
go to top