VIDEO: भारत आर्मीनं किंग कोहलीसाठी गायलं खास गाणं

साउदम्टनमध्ये पाऊस आणि अंधूक प्रकाशाचा खेळ सुरु असला तरी क्रिकेट चाहत्यांमधील सामन्याच्या निकालाची उत्सुकता अजूनही कायम आहे.
INDvsNZ
INDvsNZTwitter

IND vs NZ WTC Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मेगा फायनलमध्ये पाऊस आणि अधूंक प्रकाशाचा खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या अडथळ्यातून खेळ पुढे सरकलाय. तिसऱ्या दिवशीच्या खेळालाही सुरुवात झालीय. हे सर्व घडत असले तरी क्रिकेट चाहत्यांमधील सामन्याच्या निकालाची उत्सुकता अजूनही कायम आहे.

मोजक्या चाहत्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या सामन्यात साउदम्टनच्या स्टेडियममध्ये उपस्थितीत दाखवत चाहते टीम इंडियाचा उत्साह वाढवत आहेत. भारतीय संघाचे सर्वात मोठ्या प्रमाणात समर्थन करणाऱ्या भारत आर्मीची (Bharat Army) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारत आर्मीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये भारत आर्मीतील लोक विराट कोहलीसाठी गाणं गाताना दिसत आहेत. भारत आर्मीने 'वी विल रॉक यू' गाणे आपल्या अंदाजात गात किंग कोहलीचे समर्थन केल्याचे व्हिडिओतून दिसून येते. आयसीसीने भारत आर्मीचा हा खास व्हडिओ आपल्या अधिकृत इन्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलाय. या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळताना दिसते. साउदम्टनच्या द रोस बाउल स्टेडियमवर भारत आर्मीने विराट कोहलीला अनोख्या पद्धतीत चियर केले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे लाइव्ह अपेडेट्स एका क्लिकवर

मेगा फायनलच्या लढतीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ पहिल्या डावात 300 + धावा करुन न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी भारतीय डावाला सुरुवात केली. विराट कोहली या सामन्यात शतकांचा दुष्काळ संपवेल, अशी आशा होती. पण तो तिसऱ्या दिवशी एकाही धावेची भर न घालता चालता झाला. जेमीसन याने त्याला 44 धावांवर बाद केले.

INDvsNZ
WTC: कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम; धोनीला टाकले मागे

पहिल्या दिवशी पावसाने खेळ वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सामन्यात अंधूक प्रकाशाने व्यत्यय आणला. रोहित शर्मा (34) आणि शुभमन गिल (28) धावा करुन माघारी परतल्यानंतर कर्णधार-उप कर्णधारांनी डाव सावरला. पण तिसऱ्या दिवशी विराट कोहलीच्या रुपात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय संघाने 149 धावांवर विराट कोहलीच्या रुपात चौथी विकेट गमावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com