WTC Final : टीम इंडिया अडचणीत; पंत ट्रेंडिगमध्ये

सोशल मीडियावर पंत सध्या ट्रेंडिगमध्ये दिसतोय. आजचा दिवस पंतचा आहे, अशा काही प्रतिक्रियाही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
Rishabh Pant
Rishabh PantTwittter

ICC World Test Championship Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघ अडचणीत आलाय. राखीव दिवसातील खेळाला सुरुवात झाल्यानंतर जेमिन्सनने विराट कोहली आणि पुजाराला स्वस्तात माघारी धाडत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले आहे. पुजारा बाद झाल्यानंतर रिषभ पंत मैदानात उतरला आहे. अजिंक्य रहाणेसोबत तो डाव सावरेल, अशी अपेक्षा तमाम क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. सोशल मीडियावर पंत सध्या ट्रेंडिगमध्ये दिसतोय. आजचा दिवस पंतचा आहे, अशा काही प्रतिक्रियाही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

कायले जेमिन्सन याने त्यालाही खिंडीत गाठले होते. मात्र स्लिपमध्ये साउदीने कॅच सोडला आणि पंतच्या लाखो चाहत्यांसह टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. भारताच्या डावातील 40 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिन्सनने टाकलेला चेंडू पंतच्या बॅटची कड घेऊन साउदीच्या हातात गेला. एक सोपी संधी त्याने गमावली. हा झेल न्यूझीलंडच्या संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com