IND vs PAK: अंपायर झोपेत! एका षटकात 6 ऐवजी टाकले 7 चेंडू अन् पाकिस्तानच्या डोळ्यात आले पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nida Dar seven-ball over and Umpire possible negligence leaves fans bamboozled

IND vs PAK: अंपायर झोपेत! एका षटकात 6 ऐवजी टाकले 7 चेंडू अन् पाकिस्तानच्या डोळ्यात आले पाणी

IND vs PAK Women's T20 World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाने ICC महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना जिंकत विजयाने सुरुवात केली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने कर्णधार मारूफच्या अर्धशतकाच्या जोरावर 4 गडी गमावून 149 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने एकापाठोपाठ एक 3 विकेट गमावल्या होत्या, पण अनुभवी जेमिमा रॉड्रिग्सने सामना जिंकून देणाऱ्या डावात संघाला विजयापर्यंत नेले.

लाईव्ह मॅचदरम्यान अशी घटना घडली ज्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांचे होश उडाले. ही घटना भारताच्या डावाच्या आठव्या षटकात घडली जेव्हा पाकिस्तानी खेळाडू निदा दारने एका षटकात 6 ऐवजी 7 चेंडू टाकले. कदाचित अंपायरच्या संभाव्य निष्काळजीपणामुळे असे घडले असावे. निदा दारच्या 7 चेंडूंच्या षटकावर पाकचे चाहते तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरने ट्विट करून लिहिले की, 'मैदानावर काय झाले की निदा दारने सात चेंडूंचे ओव्हर टाकले आणि एका अतिरिक्त चेंडूवर चौकार मारला. पंच झोपले आहेत का? आणखी एका युजरने लिहिले की, 'हास्यास्पद अंपायरिंग, ओव्हरच्या सातव्या चेंडूवर निदा दारच्या बाऊंड्रीमुळे भारताला 4 अतिरिक्त धावा गेल्या हा चेंडू टाकायला नको होता.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाक संघाने 4 गडी गमावून 149 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून बिस्माह मारूफने 55 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या, तर खालच्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या आयशा नसीमने 25 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. भारताकडून राधा यादवने 2, दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकरने 1-1 विकेट घेतल्या. टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला.