IND vs SA: पहिल्या मॅचमध्ये उमरानला संधी मिळणं कठीण, कारण पंत...

वेगवान युवा गोलंदाज उमरान मलिकच्या चाहत्यांसाठी निराशजनक माहिती समोर
Umran Malik
Umran Malik Sakal

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाने सोमवारी जोरदार तयारी सुरु केली आहे. ही मालिका ९ जूनपासून सुरु होणार आहे. पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, वेगवान युवा गोलंदाज उमरान मलिकच्या चाहत्यांसाठी निराशजनक माहिती समोर आली आहे. संघात स्थान मिळण्यासाठी त्याला थोडे दिवस थांबाव लागणार आहे. अशी शक्यता क्रिकेट जगतात वर्तवण्यात आली आहे.

Umran Malik
राहुल द्रविड घेतोय उमरान मलिकची शाळा, टिप्स देतानाचा VIDEO व्हायरल

आगामी मालिकेसाठी भारतीय संघ रविवारी एकत्र जमला असला, तरी दक्षिण आफ्रिकी संघ मात्र २ जून रोजीच भारतात दाखल झाला आहे. सध्या दोन्ही संघ सराव करण्यात व्यस्त आहेत.

जानेवारी महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने कसोटी मालिकेत १-२, तर एकदिवसीय मालिकेत ३-० ने पराभव स्वीकारला होता. आता भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे ‘राहुलसेना’ कंबर कसताना दिसत आहे.

या होणाऱ्या टेस्ट सीरीजसाठी वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. सरवा दरम्यान मलिकने आपल्या खास शैलीत टाकलेल्या चेंडूवर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने फटकेबाजी केली. त्याची फटकेबाजी पाहून मलिकच्या गोलंदाजीवर शंका उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट जगतात त्याला साऊथ अफ्रिकेविरुद्ध पहिल्या मॅचमध्ये संधी मिळणं कठीण असल्याच म्हटलं जात आहे.

Umran Malik
उमरान मलिकने ब्रेट लीला दिले सडेतोड उत्तर, मी...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका 9 जूनपासून सुरू होत आहे. पहिला सामना दिल्लीत होणार आहे. या आगामी मालिकेसाठी भारताचे वरिष्ठ खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांना विश्रांती दिली केली आहे. याच कारणास्तव कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलवर असेल.

उमरान मिलक आणि अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजांना या मालिकेसाठी पहिल्यांदाच भारतीय संघात सहभागी केले गेले आहे. तसेच अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनीही या मालिकेसाठी संघात जोरदार पुनरागमन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com