भारतीय संघाला तुम्हीही द्या शुभेच्छा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

ई सकाळने भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठ निर्माण केले असून, नागरिकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात.

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष असून, भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. भारतीय संघाला तुम्हीही शुभेच्छा देऊ शकता प्रतिक्रियांच्या माध्यमातून...

पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमदचे उत्तर प्रदेशात राहत असलेल्या काकांनी भारतीय संघाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनीही भारतीय संघच जिंकावा अशी इच्छा बोलून दाखविली आहे. भारतीय संघाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना व यज्ञ केले जात आहेत. विजयासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. त्यामुळे आपणही भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी सरसावले पाहिजे.

ई सकाळने भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठ निर्माण केले असून, नागरिकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात.

Web Title: India and Pakistan set to meet in ICC Champions Trophy final