भारत कसोटी क्रमवारीत आजच ठरणार अव्वल?

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

कानपूर- भारताचे सर्व फलंदाज बाद करण्यात सकाळच्या सत्रातच न्युझीलंडच्या गोलंदाजांना यश मिळाले असून, 376 धावांचे आव्हान न्युझीलंडच्या संघापुढे आहे. दरम्यान, किवींनी पहिल्या षटकात बिनबाद 2 धावा करीत सुरवात केली. 

भुवनेश्वर कुमारच्या धडाकेबाज खेळीने सुरवात केली, मात्र त्याला रोख लावण्यात किवी गोलंदाज वॅगनरला यश आले. त्याने भुवनेश्वरच्या रुपाने वैयक्तिक कारकिर्दीतील 99वा बळी मिळवला. त्यावेळी भारत 363 धावांनी आघाडीवर होता. भारतीय संघ कदाचित आजच (सोमवार) मालिका जिंकेल, आणि जागतिक कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानही पटकावेल अशी क्रिकेट रसिकांना आशा आहे.

भुनेश्वरने 51 चेंडूंत 23 धावा केल्या. वर्धमान साहा आणि भुनेश्वरने चौथ्या दिवसाची सुरवात प्रभावीपणे केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीयांकडे 339 धावांची आघाडी होती. पाऊस किवींच्या मदतीस धावून येण्याची चिन्हे नाहीत, या परिस्थितीत ते भारताच्या आव्हानाला कसे सामोरे जातात याकडे लक्ष लागून राहिले आहे

Web Title: India to be number one in ICC Test rankings