भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

रविवार, 30 डिसेंबर 2018

आज (रविवार) सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताला दोन बळी टिपून ऑस्ट्रेलियाचा डाव संपविण्याची गरज होती. पण, सकाळपासून पाऊस सुरु झाल्याने सामना सुरु होण्यास विलंब झाला. मात्र, सामना सुरु होताच बुमरा आणि ईशांतने एक-एक बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 261 धावांत संपुष्टात आणला. दुसऱ्या डावातही बुमराने तीन बळी मिळविले. तर, पहिल्या डावात त्याने सहा बळी घेतले होते. त्यामुळे त्याला सामन्याचा मानकरी म्हणून निवडण्यात आले.

मेलबर्न : गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

आज (रविवार) सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताला दोन बळी टिपून ऑस्ट्रेलियाचा डाव संपविण्याची गरज होती. पण, सकाळपासून पाऊस सुरु झाल्याने सामना सुरु होण्यास विलंब झाला. मात्र, सामना सुरु होताच बुमरा आणि ईशांतने एक-एक बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 261 धावांत संपुष्टात आणला. दुसऱ्या डावातही बुमराने तीन बळी मिळविले. तर, पहिल्या डावात त्याने सहा बळी घेतले होते. त्यामुळे त्याला सामन्याचा मानकरी म्हणून निवडण्यात आले.

त्यापूर्वी चौथ्या दिवशी भारतीयांसमोर पुन्हा ऑस्ट्रेलियाने नांगी टाकली आणि भारतीयांनी दिलेले खडतर आव्हान चौथ्या दिवसअखेर कांगारुंसाठी स्वप्नवतच झाले होते. भारतीय फलंदाजांना पहिल्या डावाप्रमाणे हुकुमत राखता आली नाही नव्हती; पण 8 बाद 106 धावांवर कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित करून विजयासाठी 399 धावांचे खडतर आव्हान ऑस्ट्रेलियास दिले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया फलंदाजांनी अडखळता प्रवास करताना 8 बाद 257 ची मजल मारली. पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने एक तास खिंड लढवल्याने चौथ्या दिवशीचा पराभव टाळला, हेच समाधान कांगारुंना लाभले होते. पण, अखेरच्या दिवशी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :
भारताचा ऐतिहासिक विजय; मालिकेत 2-1 ने आघाडी

Web Title: India beat Australia in Melbourne take 2-1 lead in test series