भारताकडून न्यूझीलंडचा धुराळा; मालिकेत विजयी आघाडी

वृत्तसंस्था
सोमवार, 28 जानेवारी 2019

तिसऱ्या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवित मालिकाही खिशात घातली. दिनेश कार्तिक आणि अंबाती रायुडू यांनी भारताला टोलेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला. 

माऊंट मौनागुई : भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही उत्तम खेळ करत न्यूझीलंडलाही शरणागती पत्करण्यास भाग पाडले. तिसऱ्या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवित मालिकाही खिशात घातली. दिनेश कार्तिक आणि अंबाती रायुडू यांनी भारताला टोलेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला. 

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र,  प्रथम फलंदाजी करुदे अथवा धावांचा पाठलाग करुदे, न्यूझीलंडची फलंदाजी या मालिकेत कायम गडगडत आली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी किवींचा डाव 243 धावांतच रोखला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :
INDvsNZ : कोहलीसेनेसमोर आता न्यूझीलंडनेही टेकले गुडघे; भारत अजिंक्यच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India beat New Zealand by 7 wickets win ODI series