यश फडतेने ठेवले विश्व ज्युनिअर स्कॉश स्पर्धेत भारताचे आव्हान जीवंत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

गोव्याच्या यश फडतेने चेन्नई येथे खेळविण्यात येत असलेल्या 19 वर्षांखालील विश्व ज्युनिअर स्कॉश स्पर्धेत भारताचे आव्हान जीवंत ठेवले आहे. या विश्वचषक स्पर्धेत यश फडतेने वैयक्तिक प्रकारात उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली, पण या फेरीत त्याला कडव्या लढतीनंतर पराभूत व्हावे लागले होते. मात्र या 16 वर्षीय स्कॉशपटूने सांघिक प्रकारात भारतीय तिरंगा फडकाविण्याच्या इराद्याने आपला सर्वांग सुंदर खेळ चालूच ठेऊन भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश मिळवून दिला.

मुरगाव- गोव्याच्या यश फडतेने चेन्नई येथे खेळविण्यात येत असलेल्या 19 वर्षांखालील विश्व ज्युनिअर स्कॉश स्पर्धेत भारताचे आव्हान जीवंत ठेवले आहे. या विश्वचषक स्पर्धेत यश फडतेने वैयक्तिक प्रकारात उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली, पण या फेरीत त्याला कडव्या लढतीनंतर पराभूत व्हावे लागले होते. मात्र या 16 वर्षीय स्कॉशपटूने सांघिक प्रकारात भारतीय तिरंगा फडकाविण्याच्या इराद्याने आपला सर्वांग सुंदर खेळ चालूच ठेऊन भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश मिळवून दिला.

स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी भारतीय संघाला स्विझरलॅंडच्या संघाबरोबर लढायचे होते. लढत बरीच आव्हानात्मक होती. तरीही भारतीय संघातील खेळाडू डगमगले नाहीत. उत्कर्ष बहेती या खेळाडूने पहिला सामना जिंकून भारताला आघाडी मिळवून दिली, त्यामुळे यजमानांचे मनोधैर्य वाढले. उत्कर्षने पहिल्या सामन्यात कॅम्पबेल वेल्स ह्याचा 11/6, 6/11, 13/11 आणि 11/9 अशा फरकाने पराभव केला. त्यानंतर खेळविण्यात आलेल्या दूसऱ्या सामन्यात भारताचा वीर चोत्रांनी 3/1 अशा सेटनी पराभूत झाल्याने भारता समोर संकट उभे राहिले.

आता सर्व मदार कर्णधार यश फडतेवर होती. त्याने आपले सर्व कौशल्य पणास लावून स्वित्झरलँडच्या अव्वल मानांकित यानिक व्हिलयमी याचे आव्हान मोडून काढीत भारताला स्पर्धेची बाद फेरी गाठून दिली. हा निर्णायक सामना यशने 11/8, 7/11, 5/11, 11/4 आणि 11/9 अशा गुण फरकांनी जिंकला. वास्तविक या सामन्यात यश फडते 1/2 अशा सेटने पिछाडीवर होता, तरीही त्याने आपली जीद्द कायम ठेऊन या स्पर्धेत भारताचे आव्हान जीवंत ठेवले. बाद फेरीत उद्या गुरुवारी भारतीय संघाची लढत पाकिस्तान बरोबर होणार आहे.

Web Title: India challenge in the World Junior Squash Championship is alive