टीम इंडियाला घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका नाही आली जिंकता

9 जूनपासून सुरू झालेली पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली
india could not win t20i series against south africa home in 3rd attempt
india could not win t20i series against south africa home in 3rd attempt

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकता आली नाही. 9 जूनपासून सुरू झालेली पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना पावसामुळे वाया गेला आणि त्यामुळे या मालिकेतील विजेत्या संघाची घोषणा होऊ शकली नाही. मात्र चांगली गोष्ट म्हणजे पाहुण्या संघाला ही मालिका जिंकता आली नाही.(india could not win t20i series against south africa home in 3rd attempt)

india could not win t20i series against south africa home in 3rd attempt
IND vs SA T20I : शेवटचा सामना पावसामुळे रद्द, मालिका 2-2 अशी बरोबरीत

दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्यांदा भारत T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी आला होता. याआधी आफ्रिका संघाने भारतचा दोनदा टी-20 मालिकासाठी दौरा केला होता. ज्यामध्ये एक मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकली होती, तर एक मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली होती. त्याच वेळी, आता ही तिसरी मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन आणि भारताने शेवटचे दोन सामने जिंकले आहे.

india could not win t20i series against south africa home in 3rd attempt
वृद्धिमान साहा दिसणार 'या' संघासाठी 'प्लेअर कम मेंटॉर'च्या भूमिकेत

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2015 मध्ये भारतात पहिल्यांदा टी-20 मालिका खेळली होती. दक्षिण आफ्रिकेने त्या मालिकेत 3 पैकी दोन सामने जिंकले होते, तर एक सामना पावसामुळे वाया गेला होता. दक्षिण आफ्रिका 2019 मध्ये दुसऱ्यांदा भारतात टी-20 मालिका खेळण्यासाठी आली. त्या मालिकेत 1-1 सामना दोन्ही संघांनी जिंकला होता, तर एक सामना पावसामुळे वाया गेला होता. 2022 मध्येही असेच घडले होते, पण तरीही भारताने मालिका जिंकलेली नाही.

या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, पहिला सामना दिल्लीत खेळला गेला, दक्षिण आफ्रिकेने जो 7 विकेट्सने जिंकला, तर दुसरा सामना कटकमध्ये खेळला गेला, तो देखील पाहुण्या संघ दक्षिण आफ्रिकेने जिंकला. मात्र विशाखापट्टणम येथील तिसरा सामना भारताने 48 धावांनी आणि राजकोटच्या मैदानावर चौथा सामना 82 धावांनी जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. अंतिम आणि निर्णायक सामना पावसामुळे वाया गेला आणि त्यामुळे या मालिकेतील विजेत्या संघाची घोषणा होऊ शकली नाही. जी अखेर 2-2 अशी बरोबरीत संपली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com