आशियाई टेटेमध्ये भारत पाचव्या स्थानी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

भारतीय टेबल टेनिस संघाने आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करताना पाचवा क्रमांक मिळवला. भारताने हॉंगकॉंगला 5-0 असे हरवून ही कामगिरी केली, त्याचबरोबर इराणला 3-0 असे हरवून भारताने या स्पर्धेतील प्रथम श्रेणी विभागात सुवर्णपदक जिंकले.

मुंबई : भारतीय टेबल टेनिस संघाने आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करताना पाचवा क्रमांक मिळवला. भारताने हॉंगकॉंगला 5-0 असे हरवून ही कामगिरी केली, त्याचबरोबर इराणला 3-0 असे हरवून भारताने या स्पर्धेतील प्रथम श्रेणी विभागात सुवर्णपदक जिंकले.

पाचव्या क्रमांकाच्या लढतीसाठी भारताने आपली पसंती बदलली. शरथ कमलने पाच गेमच्या लढतीत भारतास विजयी सुरुवात करून दिली. अँथनी अमलराजने पहिला गेम गमावल्यावर 3-1 विजय मिळवला; तर साथीयनलाही चार गेमच्या लढतीस सामोरे जावे लागले. या स्पर्धेत साथीयनने एकही सामना गमावलेला नाही.

प्रथम श्रेणीतील सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने इराणचे कडवे आव्हान परतवले. शरथ कमलने तीन गेममध्येच बाजी मारत भारतास जोरदार सुरुवात करून दिली, पण त्यानंतर जी साथीयन आणि अँथनी अमलराजला पाच गेमच्या लढतीपर्यंत झुंजावे लागले. पण भारतानेच अखेर वर्चस्व राखत सुवर्णपदक संपादले. आता वैयक्तिक स्पर्धेस सुरुवात होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india finished fifth in asian table tennis