IndvsAus : बुमराचे सहा बळी; भारताकडे 292 धावांची आघाडी 

शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मेलबर्न : 'जसप्रित बुमरा खूपच कमी सामने खेळला आहे; पण लवकरच तो क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये 'नंबर वन' होईल', असे भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्क याने कालच वर्तविले होते. तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बुमराने ऑस्ट्रेलियाला जोरदार दणके देत याचीच प्रचिती दिली.

बुमराने सहा गडी बाद करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 151 धावांत गुंडाळला. 

भक्कम आघाडी असूनही भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला 'फॉलोऑन' दिला नाही. त्यामुळे आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अशक्‍यप्राय आव्हान ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. 

गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे भारताकडे आता तब्बल 292 धावांची आघाडी आहे. सहा गडी बाद करणारा बुमरा भारताचा 'स्टार' गोलंदाज ठरला. ईशांत शर्मा आणि महंमद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला; तर संघातील समावेशावरून मैदानाबाहेरच चर्चा झालेल्या रवींद्र जडेजाने दोन गडी बाद करत उपयुक्तता सिद्ध केली. 

सविस्तर बातमी वाचा

Web Title: India gets 292 runs lead against Australia in Boxing Day Test