मुंबई : आशियाई युवा व्हॉलीबॉल स्पर्धेत उद्या (ता. 10) भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. म्यानमारमध्ये होत असलेल्या या स्पर्धेतील ही लढत स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता होईल.
उपांत्यपूर्व फेरीत भारताने ऑस्ट्रेलियास 16-25, 25-19, 25-21, 27-25 असे पराजित केले, तर पाकिस्तानने कझाकिस्तानला 25-21, 25-18, 17-25, 25-21 असे पराजित केले. पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीच्या इ गटात अव्वल आले होते, तर भारत फ गटात दुसरा होता.
भारतास उपांत्यपूर्व फेरीच्या गटात जपानविरुद्ध 2-3 हार पत्करावी लागली होती, त्यामुळे भारत गटात दुसरा आला. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य लढत होणार आहे.
भारतीय संघ जपानविरुद्ध 25-20, 18-25, 23-25, 25-18, 12-15 असा पराजित झाला. भारताकडून अमितने आक्रमणात सर्वाधिक 18 गुण नोंदवले. महेश राजाने आक्रमणात 15; तर बचावात दोन गुणांची कमाई केली. भारत त्यांच्या गटात जपानपाठोपाठ आला; तर पाक अव्वल आलेल्या गटात ऑस्ट्रेलिया तिसरे आला होता |
|
|