IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढत १५ ऑक्टोबरला?

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा; इंग्लंड-न्यूझीलंड लढतीने सलामीची शक्यता
India-Pakistan fight on October 15 Cricket World Cup England-New Zealand likely to open
India-Pakistan fight on October 15 Cricket World Cup England-New Zealand likely to opensakal

नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही; परंतु स्पर्धेचे पडघम अगोदरपासूनच वाजू लागले आहेत. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार नेहमीच बहुचर्चित असेली भारत-पाक लढत १५ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.

भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होण्याची शक्यता असून हा सामना चेन्नईत होईल, असे या वृत्तात म्हणण्यात आले आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना २०१९ मध्ये अंतिम लढत खेळणाऱ्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीने ५ ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल, तर अंतिम सामनाही याच स्टेडियमवर १९ नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तान खेळणार

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमधून हलवण्यात आली असली तरी पाकिस्तानचा संघ भारतातील या विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार आहे. आशिया कप स्पर्धा खेळण्यास भारतीय संघ पाकमध्ये आला नाही तर भारतातील विश्वकरंडक स्पर्धेवर आम्ही बहिष्कार टाकू, अशी धमकी त्यांच्याकडून अगोदर देण्यात आली होती.

...तर गुण कमी होणार

आम्ही अहमदाबादमध्ये आमचे सामने खेळणार नसल्याची नकार घंटा पाक मंडळाकडून वाजवण्यात येत आहे; परंतु बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर कोणत्याही ठोस कारणाशिवाय पाकिस्तान संघ ठराविक ठिकाणी खेळण्यास नकार देऊ शकत नाही. तसे केल्यास त्यांचे गुण कमी होऊ शकतात.

पाकचे सामने अहमदाबादसह हैदराबाद, चेन्नई, बंगळूर येथे अपेक्षित असल्याचा उल्लेख करण्यात येत आहे. या ठिकाणांसह कोलकता, दिल्ली, धरमशाला, गुवाहाटी, राजकोट आणि रायपूर येथे साखळी सामने होतील; तर मुंबईत एका उपांत्य सामन्यासह इतर साखळी लढती अपेक्षित आहेत.

या विश्वकरंडक स्पर्धेत १० संघ असून ४८ सामने होतील. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका थेट पात्र ठरले आहेत. इतर दोन संघ पात्रता स्पर्धेतून निश्चित होतील.

श्रीलंका, विंडीजचे भवितव्य

१८ जून ते ९ जुलैदरम्यान झिम्बाब्वेत ही पात्रता स्पर्धा होत असून माजी विजेत्या वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांचे भवितव्य तेथून ठरणार आहे. पात्रता स्पर्धेत नेदरलँडस, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, अमिराती आणि यजमान झिम्बाब्वे हे इतर देश आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com