INDvsBAN : मयांक शतकाच्या उंबरठ्य़ावर, भारत तीन बाद 188

India scores 188 for 3 before lunch in 1st test against bangladesh
India scores 188 for 3 before lunch in 1st test against bangladesh

इंदूर : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असेलल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपहारापूर्वी भारताने 188 धावांची मजल मारली. भारताचा सलामीवीर मयांक अगरवाल शतकाच्या उंबरठ्यावर आहे तर त्याला उपकर्णधाक अजिंक्य रहाणे साथ देत आहे. 

दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यावर चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमधील 72 चेंडूमध्ये 54 धावा केल्या. हे त्याचे सहावे क्रमांकाटे सर्वात जलद अर्धशतक होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 54 चेंडूमध्ये शतक केले होते. मात्र, त्यानंतर तो लगेच बाद झाला. 

पुजारानंतर भरवशाचा फलंदाज विराट कोहली मैदानावर आला मात्र, तोही फक्त दोन चेंडूच टिकला आणि शून्यावर बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची ही त्याची दहावी वेळ आहे.

त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि मयांक यांनी डावाला आकार दिला. या दोघांच्या फलंदाजीमुळे भारताने 188 धावांचा टप्पा गाठला. मयांक सध्या 91 तर रहाणे 35 धावांवर खेळत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com