INDvsWI : एक विजय आणि भारताने कमावले तब्बल 60 गुण

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा परदेशातील सर्वांत मोठा विजय आहे. याच विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल 60 गुणांची कमाई केली आहे. 

अॅंटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा परदेशातील सर्वांत मोठा विजय आहे. याच विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल 60 गुणांची कमाई केली आहे. 

भारत आणि विंडीज या दोन्ही संघांचा हा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिला सामना होता. हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील चौथ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा विजय होता. 

या विजयासह भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला विजयी सुरवात केली आहे. भारताने विंडीजसमोर विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ अवघ्या 100 धावा करू शकला. विंडीजचा निम्मा संघ 7.3 षटकांतच 15 धावांत गारद झाला होता. त्यानंतर तळातल्या फलंदाजांनी प्रतिकार संघाला मानहानिकारक धावसंख्येपासून वाचविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India scores 60 runs in Test Championship after a win against WI