esakal | India T20 World Cup squad : शार्दूल ठाकूरचं स्थान जवळपास निश्चित
sakal

बोलून बातमी शोधा

India T20 World Cup squad : शार्दूल ठाकूरचं स्थान जवळपास निश्चित

India T20 World Cup squad : शार्दूल ठाकूरचं स्थान जवळपास निश्चित

sakal_logo
By
सुशांत जाधव

India T20 World Cup squad : इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यातील खेळीनं शार्दूल ठाकूरचे (Shardul Thakur) टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या संघातील स्थान जवळपास पक्के केले आहे. 17 ते आक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत युएई आणि ओमनच्या मैदानात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बुधवारी मुंबईच्या बीसीसीआयचीच्या (BCCI) मुख्य कार्यलयात यासंदर्भात बैठक घेणार असल्याची चर्चा आहे.

इंग्लंड दौऱ्यावर असलेला कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ऑनलाईन या बैठकीत सहभागी होणार असल्याचेही बोलले जात आहे. यांच्याशिवाय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचाही या बैठकीत सहभाग असेल.

हेही वाचा: मिस्बाह-वकार युनिस पळकुटे! रावळपिंडी एक्स्प्रेसचा खतरनाक बाउन्सर

पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या पूर्वीप्रमाणे सातत्याने गोलंदाजी करताना दिसत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन बॅक गोलंदाजी अष्टपैलूच्या रुपात शार्दुल ठाकूरचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे सावरला असून त्याचे स्थानही जवळपास पक्के मानले जाते. इंग्लंड विरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना त्याला खांद्याला दुखापत झाली होती. यातून तो सावरला आहे.

हेही वाचा: T20I Rankings : शफाली पहिली तर अदांनी घायाळ करणारी स्मृतीही भारीच!

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीस संघांची घोषणा केली आहे. बीसीसीआय 18 ते 20 सदस्यांची घोषणा करु शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने 23 ऐवजी 30 सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी दिली आहे. यात स्टाफ सदस्यांचाही समावेश असेल. एखादा संघ 30 पेक्षा अधिक खेळाडू आपल्या ताफ्यात ठेवू शकतो मात्र त्याचा खर्च हा संबंधित देशाच्या क्रिकेट बोर्डाला उचलावा लागेल.

loading image
go to top