
रोहित शर्मा युएईतून आमच्यासोबत येईल असे वाटले होते. पण तसे झाले नाही, आमच्यासोबत तो का आला नाही याची पूर्ण माहिती नाही, असे विराट म्हणाला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदाच रोहित शर्माच्या दुखापतीवर भाष्य केले. सिडनीतील वनडे सामन्याने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आजपासून सुरुवात होता आहे. पहिल्या वनडे सामन्यापूर्वी विराट कोहलीनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील प्रत्येक सामन्याचे लाईव्ह अपडेट्स आणि इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा
तो संघात नसल्याचा ई-मेल मिळाल्यानंतर तो आयपीएल सामन्यात मैदानात उतरला. त्यामुळे तो आमच्यासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला येईल असेच वाटले होते. पण तो आमच्यासोबत नव्हता. यासंदर्भात आम्हाला कोणतीही कल्पना नाही. त्याच्या अनुपस्थितीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे, असे विराट कोहलीने म्हटले आहे. रोहितच्या फिट अनफिटच्या खेळानंतर विराट कोहलीच वक्तव्यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया रंगण्याची चिन्हे आहेत.