भारताच्या इंग्लंड दौर्‍याची खऱ्या अर्थाने तयारी सुरु 

सुनंदन लेले
रविवार, 1 जुलै 2018

मँचेस्टर - आयर्लंड समोरचे दोन्ही सामने फारच लुटुपुटुचे ठरले. भारतीय संघाला कडक उन्हातही कणभर घाम फुटला नाही इतके सहज आणि मोठे विजय भारतीय संघाला संपादता आले . थोडाफार सराव झाला इतकेच समाधान म्हणता येईल. 

३ जुलै पासून चालू होणारी क्रिकेटची लढाई खूप वेगळी तसेच घनघोर असणार ह्याची पूर्ण कल्पना विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांना आहे. हेच कारण आहे कि भारतीय संघाने मँचेस्टरला पोहोचल्यावर थोडी विश्रान्ती घेऊन लगेच ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर जाऊन सरावाला प्रारंभ केला. सराव सक्तीचा नव्हता तरी बहुतेक सर्व खेळाडू आनंदाने सरावात सहभागी झालेले दिसले .

जसप्रीत बुमरा आणि वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली ज्याची गंभीर दाखल संघ व्यवस्थापनाने घेतली आहे. "दुखापत होऊ नये म्हणून सगळे प्रयत्न आम्ही करतो पण त्यातून कोणाचे नशीब रुसले असले तर काहीच करता येत नाही. बुमराची दुखापत खूप गंभीर नाही तो तीनही  टी २० सामान्यांना मुकेल. वॉशिंग्टन सुंदरची दुखापत गंभीर आहे ज्याचे मला खरंच वाईट वाटले कारण तो गुणवान खेळाडू असून दौऱयाच्या सुरुवातीला असे व्हावे हे बरोबर नाही", संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाला. 

जाळ्यातील सरावादरम्यान सर्व प्रमुख फलंदाजांनी प्रत्येकी २० मिनिटे सराव केला. वेगवान गोलंदाज थोडा वेळ गोलंदाजी करून मग विश्रांती घेताना दिसले इतके मँचेस्टरचे ऊन कडक होते. 

२जुलै पासून इंग्लंड संघही ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सराव करून भारतीय संघाला पहिल्या टी२० सामन्यात भिडणार आहे.

Web Title: India tour of England 2018