
IND vs AUS India Playing 11 : पाठीवर राहुलचं ओझं वाहणारा रोहित देणार अक्षरचा बळी?
IND vs AUS 3rd Test India Playing 11: बॉर्डर - गावसकर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना हा 1 मार्चपासून इंदौर येथे सुरू होत आहे. भारताने पहिले दोन कसोटी सामने जिंकून मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली आहे. आता रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया हा तिसरा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याच्या तयारीत आहेत. मात्र असे असले तरी भारतासमोर तिसऱ्या कसोटीत प्लेईंग 11 निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
सर्वात मोठा प्रश्न सलामीला सुमार कामगिरी करणाऱ्या केएल राहुलचं ओझं तिसऱ्या सामन्यात देखील वहायचं की शुभमन गिलला संधी द्यायची हा असणार आहे. याचबरोबर इंदौरमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत अक्षर पटेलला खेळवत तीन फिरकीची रणनिती कायम ठेवायची का तिसऱ्या वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरायचे हा देखील मुद्दा रोहित शर्मासमोर प्लेईंग 11 ठरवताना असणार आहे.
गिल की राहुल?
शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्याच महिन्यात शतकी तसेच द्विशतकी खेळी केली आहे. मात्र तरी देखील संघ व्यवस्थापनाने केएल राहुलला दुसरा सलामीवीर म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला. संघ व्यवस्थापन राहुलवर विश्वास दाखवत आहे. मात्र राहुलसाठी तिसरा कसोटी सामना हा कामगिरी उंचावण्याची शेवटची संधी असणार आहे.
खेळपट्टी अक्षर पटेलचा बळी घेणार?
इंदौरची खेळपट्टीवर चेंडू चांगल्या प्रकारे उसळी घेतो. या मैदानावर कमी कसोटी सामने झाले आहेत. मात्र झालेल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघ सध्या तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरतोय.
मात्र होळकर स्टेडियमवरील लाल मातीची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना चांगला बाऊन्स मिळवून देते. त्यामुळे या कसोटीत भारतीय संघाने जर तीन वेगवान गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरायचे ठरवले तर अक्षर पटेलच्या नावावर कात्री लागू शकते.
अक्षरने दोन्ही कसोटीत गोलंदाजीत फारशी भरीव कामगिरी केली नसली तरी दमदार फलंदाजी करत संघाला बॅटिंग डेप्थ मिळवून दिली होती. त्यामुळे रोहित बहुदा अक्षर सोबतच जाईल.
भारताची संभाव्य Playing XI IND vs AUS 3rd Test
1 ) रोहित शर्मा (कर्णधार)
2 ) केएल राहुल
3 ) चेतेश्वर पुजारा
4 ) विराट कोहली
5 ) श्रेयस अय्यर
6) केएस भरत (विकेटकिपर)
7 ) रविंद्र जडेजा
8 ) रविचंद्रन अश्विन
9 ) अक्षर पटेल / जयदेव उनाटकट
10 ) मोहम्मद शमी
11) मोहम्मद सिराज
हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही