IND vs AUS 4th Test Ahmedabad Pitch : अखेर आखाड्याची माती ठरली! नरेंद्र मोदी येणार म्हणून की... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS 4th Test Ahmedabad Pitch

IND vs AUS 4th Test Ahmedabad Pitch : अखेर आखाड्याची माती ठरली! नरेंद्र मोदी येणार म्हणून की...

IND vs AUS 4th Test Ahmedabad Pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीची चर्चा ही तिसऱ्या कसोटीच्या पराभवानंतरच सुरू झाली होती. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचाच डाव भारतावरच उलटवत 9 विकेट्सनी विजय मिळवला. या विजयामुळे मालिका जिंकून अहदमाबाद कसोटीत काही प्रयोग करण्याचा भारताचा मनसुबा उधळून लावला.

पहिल्या तीनही कसोटीत पहिल्या दिवशीपासूनच चेंडू फिरकी घेत होता. आयसीसीने देखील भारतातील खेळपट्ट्यांना फार काही चांगले रेटिंग दिले नाही. त्यामुळे अहमदाबाद कसोटीत कोणती खेळपट्टी असणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली. खेळपट्टी लाल मातीची, जी फिरकीसोबत वेगवान गोलंदाजांना देखील साथ देईल अशी करायची की काळ्या मातीतील जी लवकरात लवकर फिरकीला साथ देईल.

गुजरात क्रिकेट असोसिएशनने सामन्यासाठी कोणती खेळपट्टी तयार करणार हे अजूनपर्यंत गुलदस्त्यात ठेवले होते. अखेर त्यांनी सामन्याच्या आदल्या दिवशी खेळपट्टीबद्दल माहिती दिली. गुजरात क्रिकेट असोसिएशन चौथ्या कसोटीसाठी काळ्या मातीची खेळपट्टी तयार करणार आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनला आपली पत शाबूत ठेवायची आहे त्यामुळे त्यांनी सर्वसाधारण खेळपट्टी तयार करण्यावर भर दिला आहे. याचा अर्थ की खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासूनच चेंडू फिरकी आणि उसळी घेणार नाही.

चौथा कसोटी सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामना पाहण्यासाठी येणार आहेत. आयसीसीने दिल्ली कसोटीतील खेळपट्टीला सुमार तर इंदूर कसोटीला वाईट असे रेटिंग दिले होते. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टीवर असे आयसीसीचे ताशेरे बसू नयेत, आपली पत राखली जावी म्हणून गुजरात क्रिकेट असोसिएशन खेळपट्टी तयार करताना काळजी घेत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सूत्र सांगत होते की आम्ही चौथ्या कसोटीसाठी स्पोर्टी खेळपट्टी तयार करणार आहोत. मैदानाच्या बरोबर मध्यभागी आमच्याकडे काळ्या आणि लाल मातीच्या खेळपट्टी आहे. कोणती खेळपट्टी तयार सामन्यासाठी तयार करायची हे लवकरच ठरवले जाईल.

भारताला इंदूर कसोटीत फिरकी खेळपट्टी करण्याचा तोटा सहन करावा लागला होता. पहिल्या दिवसापासूच चेंडू फिरकी घेत होता. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात 109 तर दुसऱ्या डावात 163 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाने 76 धावांचे टार्गेट एका विकेट्सच्या मोबदल्यात पार करत मालिका जिवंत ठेवली.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर