INDW vs AUSW : भारतीय महिलांसमोर कांगारुंना थोपवण्याचं चॅलेंज

मंगळवारपासून वनडे सामन्याने भारतीय महिला संघ या दौऱ्याला सुरुवात करेल.
Indian Women Cricket Team
Indian Women Cricket Team

India Women tour of Australia, 2021 : भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मंगळवारपासून भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील मालिकेला सुरुवात होईल. भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसह तीन टी20 सामन्यांची मालिका आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. ()

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियात पहिला डे नाईट कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे हा सामना भारतीय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक असाच असेल. क्वींसलंडच्या मैदानात हा ऐतिरासिक सामना खेळवण्यात येणार आहे. मंगळवारपासून वनडे सामन्याने भारतीय महिला संघ या दौऱ्याला सुरुवात करेल.

भारतीय महिला संघ 2020 च्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाला भिडला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Indian Women Cricket Team
IPL 2020: कोहलीचा 'विराट' विक्रम; धोनी, रोहितला 'हे' जमलं नाही

ऑस्ट्रेलिया विरुद्धचे खराब रेकॉर्ड सुधारण्याचे चॅलेंज

वनडेमध्ये भारतीय महिला संघाचे ऑस्ट्रेलिया विरुद्धचे रेकॉर्ड खूपच खराब आहे. दोन्ही संघात पहिला वनडे सामना 1978 मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हापासून दोन्ही संघात 46 सामने झाले असून भारतीय महिला संघाला केवळ 9 सामन्यात यश मिळाले आहे. 37 सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2017 मध्ये भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध मोठा विजय नोंदवला होता. भारतीय महिला संघाने 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पराभवाचा दणका दिला होता. या सामन्यात हमपनप्रीत कौरने 170 धावांची खेळी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com