बांगलादेशविरूद्धच्या कसोटीत भारताची प्रथम फलंदाजी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

हैदराबाद - बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने एक गडी बाद 64 धावा केल्या आहेत.

हैदराबाद - बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने एक गडी बाद 64 धावा केल्या आहेत.

आजच्या संघात मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्‍विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीच्या सामन्यात तीन शतके झळकाविणाऱ्या करुण नायरसह कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, हार्दिक पांड्या आणि जयंत यादव यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. आज सामना सुरू झाला तेव्हा बांगलादेशच्या वतीने तास्किन अहमदने टाकलेल्या पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर लोकेश राहुल त्रिफळाचीत झाला. तेव्हा संघाच्या खात्यात केवळ दोन धावा जोडल्या गेल्या होत्या. सध्या मैदानावर मुरली विजय (34 धावा) आणि चेतेश्‍वर पुजारा (29 धावा) खेळत आहेत.

भारतीय संघामध्ये नायरऐवजी रहाणे आणि पार्थिवऐवजी साहा यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांशिवाय अन्य पर्याय भारताकडे असल्याने या सामन्यात या दोघांनाही प्रभाव पाडणे गरजेचे आहे. इंग्लंविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात रहाणे अपयशी ठरला होता, तर न्यूझीलंडविरूद्ध दुखापत होण्यापूर्वी साहाला लौकिकाप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती.

Web Title: India vs Bangladesh; India won toss elected to bat