INDvBAN : ऐतिहासिक कसोटीत ईशांतने केली 'या' विक्रमांची नोंद!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

बांगलाचे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

कोलकाता : भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामन्याला शुक्रवारी (ता.22) सुरवात झाली. तसेच या सामन्यासाठी गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जात आहे. ईडन गार्डनच्या मैदानावर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला. 

- मनू भाकरचा विश्वकरंडकात 'सुवर्ण'वेध!

मात्र, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या भारतीय त्रिकुटाने बांगलादेशची चांगलीच धूळधाण उडवली. ऐतिहासिक ठरलेल्या या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या सुरवातीपासूनच टिच्चून मारा केला. आणि बांगलादेशचा निम्मा संघ 20 षटकांतच तंबूत पाठवला.  

गोलंदाजांची विक्रमी कामगिरी :

- या सामन्यात गुलाबी चेंडूवर पहिला बळी मिळविण्याचा मान भारताच्या ईशांत शर्माच्या नावावर नोंदविला गेला.

- निर्धाव षटक टाकण्याचा विक्रमही ईशांतच्या नावे झाला. 

- तसेच ईशांतने या सामन्यात 5 बळीदेखील घेतले. 

- महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशचे सर्व फलंदाज वेगवान गोलंदाजांनी टिपले. फिरकीपटूंना विकेट मिळविण्यात या सामन्यात काहीच वाव मिळाला नाही. रविंद्र जडेजाने अवघी एक ओव्हर गोलंदाजी केली.

- #BringBackDhoni धोनीच भारी एमएसके प्रसाद तू खा खारी!

बांगलाचे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात या क्रमांकावरील फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही पाचवी वेळ ठरली. 2005 मध्ये झिम्बाब्बे आणि न्यूझीलंड सामन्यात असा प्रकार घडला होता. 

- INDvBAN : रोहित-साहाने घेतलेल्या कॅचनं डोळ्याचं पारणं फिटलं! (व्हिडिओ)

तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील फलंदाज शून्यावर बाद झालेले सामने :- 

1) ऑस्ट्रेलिया vs इंग्लंड - लीड्स (1899)

2) दक्षिण आफ्रिका vs इंग्लंड - द ओव्हल (1955)

3) वेस्ट इंडिज vs इंग्लंड - किंग्जस्टन (2004)

4) झिम्बाब्वे vs न्यूझीलंड - हरारे (2005)

5) भारत vs बांगलादेश - कोलकाता (2019)

- INDvBAN : गोलंदाजांची कमाल; पाहुण्यांचा 106 धावांमध्ये उडाला धुरळा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs Bangladesh Ishant Sharma made new records in Pink ball test match at Eden Garden