ENG vs IND : टीम इंडियासमोर साहेबांचा संघ 183 धावांत गळपटला!

ENG vs IND
ENG vs IND

भारताचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यासमोर यजमानांनी गुढघे टेकले. परिणामी यजमान इंग्लंड संघाचा पहिला डाव अवघ्या 183 धावांत आटोपला. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आपला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी कर्णधार जो रुट याने एकट्याने खिंड लढवली. त्याने 108 चेंडूत 64 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार लगावले. इंग्लंडच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. कर्णधार जो रुट याचा अपवाद वगळता एकही फलंदाज फारकाळ मैदानावर थांबू शकला नाही. बर्न्स, झॅक क्राऊली, डी. सिब्ले, लॉरेन्स, जॉस बटलर आणि रॉबिन्सन यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांसमोर त्यांनी नांगी टाकली.

कर्णधार जो रुट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी साहेबांचे मनसुबे उधळून लावले. बुमराह, शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी इंग्लंडच्या संघाला २०० च्या आत गुंडाळलं. बुमराह याने चार फलंदाजांना बाद करत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकललं. तर शमीनं तीन फलंदाजांना बाद करत यजमानांचे कंबरडे मोडले. यजमान इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी आपल्या घरच्या मैदानावर निराशाजनक कामगिरी केली. बुमराहने पहिल्या षटकात बर्न्स याला पायचीत करत भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं. पहिल्या षटकात पहिला धक्का बसल्यानंतर सिब्ले आणि क्राऊले या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांची जोडी जमतेय असं वाटत असतानाच युवा सिराज यानं क्राऊलीली बाद करत ही जोडी फोडली. क्राऊली आणि सिब्ले यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागिदारी केली.

ENG vs IND
Video: ऋषभ पंत मागेच लागला, मग विराटने घेतला DRS अन् पुढे...

क्राऊली बाद झाल्यानंतर सिब्लेच्या रुपात इंग्लंड संघाला तिसरा धक्का बसला. शमीने सिब्लेला १८ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर कर्णधार जो रुट याने फलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रुट याने बेयस्टो याच्यासोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शमीने त्याच्या मनसुब्यावर पाणी फेरलं. बेयस्टोनं २९ धावांची खेळी केली. बेयस्टोनंतर आलेला लॉरेन्सही स्वस्तात तंबूत परतला. त्याला आपलं खातेही उघडता आलं नाही. बटलर याने भारतीय गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला, मात्र १८ चेंडू खेळूनही त्याला एकही धाव काढता आली नाही. बुमराहने बटलरचा अडथळा दूर केला. त्यानंतर संयमी फलंदाजी करणारा जो रुट (६४) याला मुंबईकर शार्दुल ठाकूरने पायचीत केलं. यानंतर तळाच्या फलंदाजात सॅम कुरेन (नाबाद २७) याची फलंदाजी वगळता एकाही फलंदाला तग धरता आला नाही. भारताकडून बुमराहने ४, शमी ३, शार्दुल ठाकूर २ आणि सिराजने एका फलंदाजाला माघारी झाडलं.

ENG vs IND
Olympics : 'लव यू लिना'! भारताच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

पहिल्या दिवशी इंग्लंड संघाला १८३ धावांत रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी संयमी सुरुवात केली. सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि के. एल राहुल या जोडीने भारताला आश्वासक आणि समाधानकारक सुरुवात करुन दिली. राहुल-रोहित जोडीने पहिल्या दिवसाखेर १३ षटकांत २१ धावांची सलामी दिली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी रोहित शर्मा (९) आणि के. एल राहुल. (९) धावांवर खेळत होते. भारत अद्याप १६२ धावांनी पिछाडीवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com