
विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
India vs England 2nd Test Live : सलामीवीर रोहित शर्माचे दिड शतक 161 (231) आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाच्या 67 (149) जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवशी 300 धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. पुजारा 21 तर कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. 3 बाद 86 धावा अशा बिकट परिस्थितीतून मुंबईकरांनी टीम इंडियाला बाहेर पाडले. रोहित-अजिंक्यनं 162 धावांची भागीदारी केली.
भारताच्या धावफलकावर 248 धावा असताना रोहितच्या रुपात टीम इंडियाला चौथा धक्का बसला. जॅक लीचने त्याला बाद केले. त्याच्यापाठोपाठ अजिंक्य रहाणेही 67 धावा करुन बाद झाला. मोईन अलीने त्याला चकवा दिला. कर्णधार ज्यो रुटने अश्विनला 13 धावांवर माघारी धाडले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 6 बाद 300 धावा केल्या होत्या. पंत 33 (56)* अक्षर पटेल 5(7)* धावांवर खेळत होते.
लाईव्ह अपडेट्स :
284-6 : ज्यो रुटनं अश्विनला 13 धावांवर तंबूत धाडले
249-5 : मोईन अलीनं दिला अजिंक्यला चकवा, भारतीय संघाला पाचवा धक्का अजिंक्य रहाणे 149 चेंडूत 9 चौकाराच्या मदतीनं 67 धावा केल्या
248-4 : जॅक लीचने रोहितच्या 161 धावांच्या खेळीला ब्रेक लावला
- रोहित आणि अजिंक्य या जोडीनं संघाचा डाव सावरला असून त्यांनी शतकी भागीदारी पूर्ण केली आहे.
-अजिंक्य रहाणेचं अर्धशतक
FIFTY for @ajinkyarahane88
Live - https://t.co/Hr7Zk2kjNC #INDvENG @Paytm pic.twitter.com/MK835aMwIn
— BCCI (@BCCI) February 13, 2021
-रोहित शर्माने साजरे केले कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक
for HITMAN @Paytm #INDvENG pic.twitter.com/QMkmVi6hqw
— BCCI (@BCCI) February 13, 2021
86-3 : मोईन अलीनं किंग कोहलीला खातेही उघडू दिले नाही
85-2 जॅक लिचनं घेतली पुजाराची फिरकी, 58 चेंडूत 21 धावा करुन फिरला माघारी
0-1 - ओली स्टोननं शुभमनला खातेही उघडू दिले नाही
भारतीय संघ
रोहित शर्मा (Rohit Sharma) शुभमन गिल (Shubman Gill), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), विराट कोहली (Virat) Kohli (c), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रिषभ पंत (Rishabh Pant) (wk), अक्षर पटेल (Axar Patel), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), इशांत शर्मा (Ishant Sharma), मोहम्मद शमी (Mohammed Siraj)
इंग्लंडचा संघ
रॉय बर्न्स (Rory Burns) डॉमिनिक सिब्ले (Dominic Sibley), डॅनियल लॉरेन्स (Daniel Lawrence), ज्यो रुट (Joe Root), बेन स्टोक्स (Ben Stokes), ओली पोप (Ollie Pope), बेन फोक्स (Ben Foakes) (wk), मोईन अली Moeen Ali, स्टुअर्ट ब्रॉड Stuart Broad, जॅक लिच Jack Leach, ओली स्टोन Olly Stone
-चेपॉकच्या मैदानात प्रेक्षकांचा उत्साह
It's good to have you back #TeamIndia fans
Chepauk has come alive courtesy you #INDvENG @Paytm pic.twitter.com/QVYISf40O1
— BCCI (@BCCI) February 13, 2021