प्रॅक्टिसवेळी टीम इंडियाचा ओपनर जखमी, पहिल्या मॅचला मुकणार

दुखापतीमुळे शुभमन गिलने माघार घेतल्यानंतर रोहित शर्माच्या साथीने तो भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करेल, अशी आशा होती.
Mayank Agarwal
Mayank Agarwal BCCI Twitter

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. सलामीचा फलंदाज मयांक अग्रवाल दुखापतग्रस्त झाला असून पहिल्या कसोटी सामन्याला तो मुकणार आहे. सरावादरम्यान मोहम्मद सिराजचा उसळता चेंडू डोक्याला लागल्याने त्याला दुखापत झालीये. सध्या तो बीसीसीआय मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली असून त्याच्यावर योग्य ते उपचार सुरु असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून दिलीये. त्याची प्रकृती स्थिर असल्याचा उल्लेखही बीसीसीआयने ट्विटमध्ये केलाय.

यापूर्वी शुभमन गिल आणि वाशिंग्टन सुंदर यांना दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावरुन माघार घ्यावी लागली होती. नेट गोलंदाज आवेश खान यालाही स्पर्धेला मुकावे लागले होते. त्यात आता मयांक अग्रवालला दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. शुभमन गिलने माघार घेतल्यानंतर रोहित शर्माच्या साथीने तो भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करेल, अशी आशा होती. आता त्याच्या जागी लोकेश राहुलला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

Mayank Agarwal
ENG vs IND बुमराहचा अनोखा अंदाज; पॅड बांधून केली बॉलिंग

सराव सामन्यावेळी काय घडलं

मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवाल सराव करत होता. सिराजचा वेगाने आलेल्या शॉट चेंडूवर अग्रवालला समजला नाही. चेंडूवरची नजर हटल्याने तो थोडा गबडला. चेंडू थेट डोक्याच्या मागच्या बाजूला हेल्मेटवर जाउन आदळला. हेल्मेट काढल्यानंतर तो थोडा अस्वस्थ वाटला. डोक्याला हात लावूनच तो फिजिओ नितीन पटेलसोबत नेटमधून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत आता लोकेश राहुलला संधी मिळू शकते. पण तो भारतीय डावाची सुरुवात फारसा करत नाही. मीडल ऑर्डरला पसंती देणाऱ्या राहुलला जागा मिळाली तर डावाची सुरुवात कोण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्याच्या घडीला भारतीय संघाकडे अभिमन्यु ईश्वरनच्या रुपात सलामीचा पर्याय उपलब्ध आहे.

Mayank Agarwal
इंग्लंडवारीपूर्वी सूर्या-पृथ्वीचा कोरोना रिपोर्ट आला

असे आहे भारतीय संघाचे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्याचे वेळापत्रक

पहिला कसोटी सामना 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट भारतीय नॉटिंघम, 3:30 PM (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

दुसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट लंडन , 3:30 PM (भारतीय प्रमाण वेळेनुसार )

तिसरा कसोटी सामना 25 ते 29 ऑगस्ट लीड्स, 3:30 PM (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

चौथा कसोटी सामना, 2 ते 6 सप्टेंबर , लंडन, 3:30 PM (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

पाचवा कसोटी सामना 10 ते सप्टेंबर मँचेस्टर, 3:30 PM (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com