पहिल्या दिवशी पावसाने केला बेरंग

सुनंदन लेले 
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

लंडन - कसोटी सामना आणि तोसुद्धा लॉर्डससारख्या ऐतिहासिक मैदानावर म्हणल्यावर वातावरण क्रिकेटमय होऊन जाते. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला प्रेक्षक जसे नटून थटून जातात तसे मेरलीबोन क्रिकेट क्‍बलचे जुने जाणते सदस्य चकाचक कपडे आणि एमसीसीचा खास चट्टेरी टाय घालून सेंट जॉन्स वूड स्टेशनला उतरून लॉर्डस मैदानाकडे जाताना दिसतात तेव्हा उत्साह जाणवतो. दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ प्रत्यक्ष अनुभवायला लॉर्डस मैदानाकडे जाणाऱ्या १२ हजार प्रेक्षकांचे आणि टीव्हीवर बघायला उत्सुक असणाऱ्या लाखो क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहावर इंग्लंडच्या पिरपिऱ्या पावसाने पाणी ओतले. 

गुरुवारी दुसऱ्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार म्हणून लोकांमध्ये उत्सुकता होती. भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला दिलेली टक्कर लोकांना भावली होती. भारतीय संघात बदल होणार का? कोण नव्याने संघात दाखल होणार अशी चर्चा करत प्रेक्षक लॉर्डस मैदानाकडे जाताना दिसले. गेले ९ आठवडे पावसाने लंडनला हुलकावणी दिली होती. पावसाला लंडनची आठवण नको त्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्ट गुरुवारीच व्हावी, हा योगायोग म्हणावा लागेल. 

लॉर्डस कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसाने वाया गेला आहे. क्रिकेट रसिकांकरता चांगली बातमी अशी आहे की शुक्रवारी सकाळी खेळ चालू होण्याच्या वेळेला पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Web Title: India vs England No play second Test due to rain