भारताचा दणदणीत विजय

शुक्रवार, 29 जून 2018

डब्लीन - सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकून आयर्लंड कर्णधार  विल्सनने गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी हाती आलेल्या संधीची पुरेपूर फायदा घेत दुसऱ्या टी20 सामन्यात 4 बाद 213ची धावसंख्या उभारली. लोकेश राहुल आणि सुरेश रैनाने अर्धशतकी खेळ्या करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फलंदाजी करताना आयर्लंड संघाची अजून वाताहात झाली. 70 धावांमध्येच त्यांचे सगळे फलंदाज बाद झाले आणि भारताने दुसराही सामना 143 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. 

दौरा चालू होण्याअगोदर भारतीय संघातील जास्तीत जास्त खेळाडूंना यो1सामना सराव मिळावा म्हणून विराट कोहलीने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात बदल केले. शिखर धवन आणि धोनीला विश्रांती देताना लोकेश राहुल आणि दिनेश कार्तिकला संधी दिली. बुमरा आणि भुवनेश्‍वरकुमारला विश्रांती दिल्याने पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थ कौलला मानाची भारतीय टोपी देण्यात आली. 

विराट कोहलीने लोकेश राहुल सोबत सलामीला येणे पसंत केले. कोहली मोठा फटका मारताना लगेच बाद झाला. लोकेश राहुलने संधी साधली. सुरेश रैनासह लोकेश राहुलने शतकी भागीदारी रचली. मनमुराद फटकेबाजीचा आनंद प्रेक्षकांना दोघा भारतीय फलंदाजांनी दिला. बाद होण्याअगोदर 36 चेंडूत 70 धावा करताना लोकेश राहुलने 6 षटकार ठोकले. केवीन ओब्रायनने पहिल्याच षटकात लोकेश राहुल पाठोपाठ रोहित शर्माला बाद केले. 

सुरेश रैनाला पहिल्या चेंडूपासून सूर गवसला होता. मोठे फटके तो लीलया लगावत होता ज्याला 9हजार प्रेक्षक ओरडत दाद देत होते. 69 धावा करून रैना बाद झाला. त्यानंतर पांडे आणि पंड्या जोडीने मोठ्या फटक्‍यांची आतिषबाजी केली. हार्दिक पंड्याने 9 चेंडूत नाबाद 32 धावा करताना 4 मस्त षटकार मारले. 20 षटकांचा खेळ संपला तेव्हा भारताच्या खात्यात 4 बाद 213 धावा जमा झाल्या होत्या. पहिल्या सामन्यापेक्षाही आयर्लंड फलंदाजांची शुक्रवारच्या सामन्यात कामगिरी सुमार झाली. सर्व प्रमुख फलंदाज एकमेकांना खो देत तंबूचा रस्ता पकडत होते. अवघ्या 12.3 षटकात आयर्लंडचा डाव आटोपला यावरून फलंदाजीत झालेली वाताहात लक्षात येईल.  कुलदीप यादव आणि चहलने परत एकदा प्रत्येकी 3 फलंदाजांना बाद करून आयर्लंडचा डाव 70 धावांत संपवला. भारताने दुसरा सामना 143 धावांनी जिंकला. 

Web Title: India vs Ireland India's victory