चहल म्हणतो, तीन तीन स्वेटर घातलेत आता कपडेही संपले, देवाकडे एकच प्रार्थना... : Yuzvendra Chahal India vs Ireland | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india vs ireland t20 match yuzvendra chahal dublin weather 3 sweater story sports cricket kgm00

चहल म्हणतो, तीन तीन स्वेटर घातलेत आता कपडेही संपले देवाकडे एकच प्रार्थना...

हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण विजयाने झाले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2 टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडचा सहज पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात टीम इंडियाने विजयासाठी 9 षटकांत 109 धावांचे लक्ष्य ठेवले. लेगस्पिनर युझवेंद्र चहल या विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात त्याने केवळ एक विकेट घेतली, परंतु त्याच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विजयानंतर चहलने अजब विधान केले. (india vs ireland t20 match yuzvendra chahal dublin weather 3 sweater story)

हेही वाचा: रोहितच्या टी 20 कॅप्टन्सीबाबत विरेंद्र सेहवागचं मोठं वक्तव्यं

आयर्लंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना पावसामुळे 12-12 षटकांचा करण्यात आला होता. डब्लिनचे तापमान आधीच २० डिग्री सेल्सिअसच्या खाली होते, पावसानंतर तिथे आणखी थंडी वाढली होती. अशा स्थितीत भारतीय खेळाडूंना येथे सामना खेळताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलने सांगितले की, मी ३-३ स्वेटर घालून खेळत होतो, तरीही प्रकृती खराब होती.

हेही वाचा: SLW vs INDW : तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत लंकेने व्हाईट वॉश वाचवला

चहलने सामन्यानंतर दीपक हुडाशीही संवाद साधला. यादरम्यान तो म्हणाला की, इथली तुमची मानसिकता ठरवते. कारण इथे बोट काम करत नाही, थंडी जास्त असल्याने असे होते. दुसरा सामना २८ तारखेला आहे, एवढी थंडी पडू नये यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. 3-3 स्वेटर घातले आहे आणि आता कपडे पण संपले आहेत. या सामन्यात युजवेंद्र चहलने 3 षटकात केवळ 11 धावा दिल्या आणि 1 विकेटही घेतली. आयर्लंडमध्ये धावांचा पाऊस पडत असताना, त्यावेळी अशी गोलंदाजी केल्याबद्दल युझवेंद्र चहलला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

Web Title: India Vs Ireland T20 Match Yuzvendra Chahal Dublin Weather 3 Sweater Story Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top