INDvsNZ:रॉस टेलरनं पुन्हा दमवलं; भारतापुढं न्यूझीलंडचं तगडं आव्हान

टीम ई-सकाळ
Saturday, 8 February 2020

पहिल्या वन-डे मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या भारतीय बॉलर्सनी आज, दुसऱ्या मॅचमध्ये चुका टाळत, न्यूझीलंडच्या बॅटिंग लाईनला जखडून ठेवलं होतं.

ऑकलँड (न्यूझीलंड) INDvsNZ : न्यूझीलंडचे आठ बॅट्समन तंबूत परतले होते. स्कोअर 197 होता. पण, रॉस टेलर मैदानावर होता. त्यानं झुंजारखेळी करत, न्यूझीलंडला 273 या समाधानकारक स्कोअरपर्यंत नेऊन ठेवलं. टेलरनं 73 रन्स करून मोलाची कामगिरी बजावली. आता भारतापुढं 274 रन्सचं तगडं आव्हान आहे. आज, विराट सेना हे आव्हान कसं पेलते याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय. तीन वन-डेच्या या सिरीजमध्ये पहिल्या मॅचमधील पराभवामुळं टीम इंडियाला हे आजचं आव्हान पार करावंच लागणार आहे. आज पराभव झाला तर, न्यूझीलंड मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image

जडेजानं एका भन्नाट थ्रोवर जेम्स निशामला माघारी धाडलं

पहिल्या वन-डे मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या भारतीय बॉलर्सनी आज, दुसऱ्या मॅचमध्ये चुका टाळत, न्यूझीलंडच्या बॅटिंग लाईनला जखडून ठेवलं होतं. न्यूझीलंडचा ओपनर मार्टिन गपटिल (79 बॉल्समध्ये 79 रन्स) वगळता एकही बॅट्समन फारशी चमक दाखवू शकला नाही. न्यूझीलंची पहिली विकेट 93 रन्सवर गेली. चहलनं हेन्री निकोलसला (41 रन्स) बोल्ड करून, भारताला पहिलं यश मिळवून दिलं. 17 ओव्हर्समध्ये 93 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप मिळालेल्या न्यूझीलंडला त्याचा फायदा उठवता आला नाही. मधल्या फळीत रॉस टेलरनं एकाटी झुंज दिली. त्याला साथ देण्यात इतर बॅट्समन अपयशी ठरले. एका स्टेजला न्यूझीलंड 300 रन्सचा टप्पा गाठेल असं वाटत असताना, मधल्या फळीच्या अपयशानं न्यूझीलंडला 200 रन्सही अवघड वाटू लागल्या होत्या. पण, फॉर्ममध्ये असलेला रॉस टेलर पुन्हा टीमसाठी धावून आला आणि त्यानं तळातल्या बॅट्समनच्या साह्यानं न्यूझीलंडला 200रन्सच्या पुढं मजल मारून दिली. 

आणखी वाचा - धोनी म्हणतोय, 'पाणीपुरीला वेळ लागेल!'

स्पोर्टसच्या इतर बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

टेलरला रोखण्यात अपयश
टीम इंडियासाठी पहिल्या वन-डेमध्ये रॉस टेलर डोकेदुखी ठरला होता. या मॅचमध्ये टेलरनच टीम इंडियाला दमवलं. रॉस टेलरनं 74 बॉल्समधअये 73 रन्स करून, टीम इंडियाला दमवलं. एकवेळेस आठ आऊट 197 असा स्कोअर असताना, रॉस टेलरनं जेमीसनच्या साथीनं (24 बॉल्समध्ये नॉट आऊट 25 रन्स) नवव्या विकेटसाठी 76 रन्सची महत्त्वाची पार्टनरशीप केली. 

INDvsNZ Cricket Team India


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india vs new zealand 2nd odi 2020 new zealand target to india Ross Taylor