INDvsNZ:न्यूझीलंडकडून भारत चारीमुंड्या चीत; वन-डे सीरिजमध्ये व्हाईटवॉशची नामुष्की

टीम ई-सकाळ
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

ओपनिंगला आलेल्या गुपटिलनं 66, हेटमायरनं 80 रन्सची खेळीकडून पाया मजबूत केला होता. तर तळात ग्रँडहोमीनं नाबाद 54 रन्सची खेळीकडून न्यूझीलंडचा विजय निश्चित केला.

INDvsNZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज झालेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडनं भारताचा 5 गडी राखून पराभव करत भारताला चारी मुंड्या चीत केलं. तीन मॅचच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडनं 3-0 असा व्हाईट वॉश देत टी-20 सीरिजमधील पराभवचा वचपा काढला. भारताला अनेक वर्षांनंतर अशा पद्धतीनं वन-डे सीरिजमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतानं न्यूझीलंडपुढं 297 रन्सचं टार्गेट दिलं होतं. त्या टार्गेटचा पाठलाग करताना गुप्टील आणि हेन्री निकोलसनं 106 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप करून भारताच्या आव्हानातली हवाच काढून घेतली होती. पण, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला रोखण्याचे आटोकाट प्रयत्न केले. विल्यमसन आणि ग्रँडहोम यांनी भारताचे मॅचममध्ये परतण्याचे मनसुबे उधळून लावले. ओपनिंगला आलेल्या गुप्टीलनं 66, निकोलसनं 80 रन्सची खेळी करून पाया मजबूत केला होता. तर तळात ग्रँडहोमनं नाबाद 54 रन्सची खेळीकडून न्यूझीलंडचा विजय निश्चित केला.

स्पोर्ट्सच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Image

राहुलची सेंच्युरी
तत्पूर्वी, भारताचा भरवशाचा फलंदाज लोकेश राहुलने एकदिवसीय क्रिकेमधील चौथं शतक साजरं केलं.भारताचा डाव गडगडला असताना राहुल पुन्हा मदतीला धावून आला. त्यानं श्रेयस अय्यर आणि मनिष पांडेच्या मदतीनं भारताचा डाव सावरला आणि भारताला समाधानकार धावसंख्येच्या दिशेनं नेलं. मयांक अगरवाल केवळ एका रनवर आऊट झाला. तर, पृथ्वी शॉने थोडी फार चमक दाखवली. दबावाखाली खेळताना राहुलनं ९ चौकार आणि १ षटकार खेचत शतक पूर्ण केलं. शतक झळकावल्यानंतर राहुल 112 रन्सवर आऊट झाला. त्यामुळं भारताला 300 रन्सचा टप्पा गाठता आला नाही.

स्पोर्ट्सच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विराटचं अपयश
तिन्ही मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहली रन्स करण्यात अपयशी ठरला. त्याबरोबर तो मैदानात उतरताना कोणतिही रणनिती घेऊन उतरत नसल्याचं जाणवलं. डोकेदुखी ठरणाऱ्या रॉस टेलर विरोधात टीमकडं कोणताही प्लॅन दिसला नाही. आजही तिसऱ्या मॅचमध्ये ओपनिंग जोडी डोकेदुखी ठरत असताना, ती फोडण्यासाठी कोणतीही व्यूहरचना दिसत नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india vs new zealand 3rd odi 2020 3-0 whitewash India