IND vs NZ वनडे मालिका फ्री पाहता येणार, कोणत्या चॅनलवर होणार Live प्रसारण?| IND vs NZ ODI Series Live Telecast | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Vs New Zealand ODI Series Live Telecast Live Streaming

IND vs NZ ODI Series : वनडे मालिका फ्री पाहता येणार, कोणत्या चॅनलवर होणार Live प्रसारण?

India Vs New Zealand ODI Series : भारताने न्यूझीलंडमधील टी 20 मालिका 1 - 0 अशी खिशात टाकली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या सामन्यात देखील पावसाचा व्यत्यय आला मात्र सामना पूर्ण झाला. मात्र तिसऱ्या सामन्यात पुन्हा पावसाने खेळ खराब केला. अखेर सामना डकवर्थ लुईस नियमानुसार टाय झाला. आता भारत आणि न्यूझीलंड तीन सामन्यांची वनडे मालिका देखील खेळणार आहे. भारतीय वनडे संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. दरम्यान, टी 20 मालिकेत क्रिकेट चाहते सामना कोठे लाईव्ह टेलिकास्ट होत आहे याबाबत संभ्रमात होते. यासाठी आम्ही सामना कधी आणि कोठे पहायचा याबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देत आहोत.

हेही वाचा: IND vs BAN : भावी कर्णधार हार्दिकच संघातून गायब; बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

वनडे मालिकेतील सामन्यांचे ठिकाण आणि वेळ

IND vs NZ पहिला सामना, ठिकाण ऑकलंड, 25 नोव्हेंबर, वेळ - भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता

IND vs NZ दुसरा सामना, ठिकाण हॅमिल्टन, 27 नोव्हेंबर, वेळ - भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता

IND vs NZ तिसरा सामना, ठिकाण ख्राईस्टचर्च, 30 नोव्हेंबर, वेळ - भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता

भारतात टीव्हीवर टेलिकास्ट होईला का?

भारत आणि न्यूझीलंड दौऱ्यावरील प्रत्येकी तीन सामन्यांची टी 20 आणि वनडे सामन्यांचे मालिका डीडी स्पोर्ट्स शिवाय कुठल्याही टीव्ही चॅनलवर लाईव्ह टेलिकास्ट होणार नाहीये. भारतीय चाहत्यांसाठी डीडी स्पोर्ट्स हा एकमेव पर्याय आहे.

लाईव्ह स्ट्रिमिंग होणार?

भारत आणि न्यूझीलंडयांच्यातील टी 20 मालिकेप्रमाणे वनडे मालिकेचे देखील अमॅझोन प्राईमवर लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : पॉर्न स्टारने कतारमध्ये जाणाऱ्या इंग्लंडच्या फॅन्सना दिला सल्ला, म्हणाली...

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक

टी 20 मालिकेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात प्लेईंग 11 मध्ये संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांना खेळवण्याची जोरदार मागणी सोशल मीडियावर झाली होती. मात्र या दोघांनाही एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वनडे मालिकेत तरी या दोघांना संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का