IND vs NZ : सोशल मीडियावर रंगला मजेदार मीम्सचा खेळ

कसोटी सामन्याची दोन्ही संघातील खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. पण सध्याच्या घडीला वातावरणाने खेळ बिघडला आहे.
ind vs nz memes
ind vs nz memestwitter

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मेगा टेस्ट फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय आलाय. मॅचपूर्वी साउदम्टन पावसाने बॅटिंग केल्यामुळे टॉस वेळेत झाला नाही. एवढेच नाही तर पहिला सेशन पाण्यात गेलाय. पहिल्या सेशनमधील खेळ होऊ शकणार नाही, अशी माहिती आयसीसी आणि बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. कसोटी सामन्याची दोन्ही संघातील खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. पण सध्याच्या घडीला वातावरणाने खेळ बिघडला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर सोशल मीडियावर काही मीम्स व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर करत साउदम्प्टनच्या वातावरणाचा एक वेगळा माहोल निर्माण केलाय. काहीजण पावसातील गल्ली क्रिकेटमधील व्हिडिओ शेअऱ करत आहेत. तर काहीजण भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्या हटके मीम्स शेअर करत आनंद घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com