IND vs PAK : कोहलीची खेळी, भारताचा विजय; पाकिस्तानवर पैसा लावणारे कंगाल

betting
bettingSakal

नागपूर : टी20 विश्वचषकात काल (रविवारी) पार पडलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयामुळे भारतीयांचा दिवाळी गोड झाली आहे. पुण्यासहित भारतातील अनेक शहरांमध्ये विजयानंतर जल्लोष केला गेला पण शेवटच्या षटकातील विराट कोहलीच्या खेळीमुळे विदर्भातील क्रिकेटबुकी क्लीनबोल्ड झाले आहेत.

(India vs Pakistan Match Latest Updates)

काल ऑस्ट्रेलियामध्ये भारत पाकिस्तान सामना पार पडला. तर अनेकांनी या सामन्यासाठी सट्टा लावला होता. पाकिस्तानवर पैसे लावणारे बुकी कंगाल झाले आहेत तर भारतावर पैसे लावणाऱ्यांची चांदी झाली आहे. दरम्यान काल पाकिस्तानचा विजय होणार अशी शक्यता असताना अनेकांनी पाकिस्तानवर पैसे लावले पण शेवटच्या षटकात विराट कोहलीने केलेल्या खेळीमुळे भारताचा विजय झाला.

betting
Pune News : टँकरला बसली दुचाकीची धडक; दिवाळीच्या दिवशीच महिलेचा मृत्यू

सामन्याच्या उत्तरार्धात पाकिस्तानची गोलंदाजी चांगली झाल्यामुळे भारताचा पराभव होईल असं वाटत होतं त्यामुळे भारताचा दर ३५ पैशांवर आला होता. तर सामन्याच्या सुरूवातीला ५०-५० असा दर होता. पण भारतावर पैसे लावणाऱ्यांची चांदी झाली असून अनेकांनी चांगली कमाई केली आहे. दरम्यान या क्रिकेटबुकींवर पोलिसांचा वचप नसून विदर्भात अनेक बुकी या सामन्यात सक्रिय असल्याची माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com